मुबंई माता बाल संगोपन संस्थेच्या माध्यमातून आदिवासी शाळांना डिजिटल टॅबचे वितरण

राजगुरूनगर-मुबंई माता बाल संगोपन संस्थेने आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पाऊले चालती शिक्षणाची वाट या अनोख्या उपक्रमाची सुरूवात केली. या उपक्रमांर्गत खेड तालुक्यातील आदिवासी शाळांना 50 डिजिटल टॅबचे वितरण केले गेले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण आणि संशोधनाचे ऊर्जास्रोत असलेले पदमविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर आणि संस्थेचे अध्यक्ष ज्यूलिओ रिबेरो या कार्यक्रमास उपस्थित होते.

संस्थेचे मानद सचिव डॉ माधव साठे यांनी आपल्या मनोगतात दुर्लक्षित आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चालू केलेल्या अनेक उपक्रम अंतर्गत इ लर्निग, सौर उर्जेवर चालणाऱ्या, पुनर्बांधणी/दुरुस्ती करून मुलांना आकर्षित करणाऱ्या शैलीत रंगवलेल्या अशा अनेक उपक्रमाची माहिती दिली.या शाळा मध्ये 100% उपस्थिती अनेक वर्ष पासून आहे. आता या गेल्या 8 वर्षे चालू असलेल्या उपक्रमांनी शिक्षणाची गोडी निर्माण झाली होती. मुलांमध्ये पालकांमध्ये वैचारिक बदल घडल्याने त्यांना मुलांच्या शिक्षणात रस निर्माण झाला होता. घडणारे बदल सगळ्यांनाच जाणवू लागले होते. पण कोरोनाने सारेच उध्वस्त केले. मुलांचे शिक्षण थांबले, पालकांची स्वप्ने संपुष्टात येणार असे वाटू लागले.उपाय शोधताना फक्त ऑफलाईन हाच मार्ग होता कारण ऑनलाईन हे तर ग्रामीण भागातले दिवास्वप्न. आमच्या हाकेला धावून आले श्री बिरेन धरामासी. kompkin या त्यांच्या कंपनीने ८ वर्षापूर्वी ऑफलाईन डिजिटल अनिमेटेड शिक्षण तंत्र वापरुन दिले होते . ते आता ४१० शाळांत स्थिरावले आहे. २५००० मुलांच्या जडण घडणित खूप सुखावणारा बदल घडला आहे.
त्यांनी हेच तंत्रज्ञान आता टॅबलेट मध्ये देण्याची तयारी दर्शविली आणि उभा राहिला हा कार्यक्रम.
‘हेतू हा पुर्णत्वापेक्षा मोठा ‘ या विचारधारेला धरून एक पाऊल मागे जात ऑनलाईन च्या युगात हा ऑफलाईन कार्यक्रम आम्ही चालू करत आहोत. पट संख्या विचारात घेवून १,२,३ असे टॅबलेट त्यांना देवून स्थगित शिक्षण मार्गी लावण्याचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम. मुले आणि शिक्षक मिळून तो थोडा थोडा वेळ साऱ्या मुलांना वापरता येईल हे बघतील. शेती प्रधान देशात ग्रामीण शिक्षणात शेतीमधील कोणतेच शिक्षण नाही याचे आश्चर्य आणि खंत वाटते असे डॉ साठे यांनी नमूद केले. आणि आम्ही ते करण्याचा उपक्रम हाती घेणार असे सांगितले.

अध्यक्ष ज्यूलिओ रिबेरियो यांनी ग्रामीण विकास प्रकल्पाबद्दल सुरुवातीच्या काळात असलेली भीती व्यक्त केली. डॉ बानू कोयाजी यांच्या सुरुवातीच्या सहभागाच्या पलीकडे ग्रामीण विकास काम किती पुढे जाईल याबद्दल शंका वाटत होती असे सांगितले. तथापि त्यांनी नमूद केले की डॉ. साठे हे नेहमीच दृढनिश्चयी होते आणि हे काम आज जिथे आहे तेथे त्यांनी एकहाती आणले आहे. हा संस्थेसाठी खरोखर अभिमानाचा क्षण आहे.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी डॉ साठे यांना एक संस्था आणि प्रेरणा म्हणून संबोधित केले.शिक्षणाचे महत्व सांगत त्यांनी या धाडसी पण अत्यंत उपयुक्त आणि काळास सजेश्या टॅबलेट उपक्रमाचे स्वागत करीत उद्घाटन केले.

शिक्षण सर्व काही आहे आणि ते सर्वांगीण असले पाहिजे असे प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की असे नवीन तंत्रज्ञान या वंचित पर्यंत पोचले तरच भारताची वेगवान प्रगती होईल. मुंबई माता आणि बाल संगोपन संस्था करत असलेल्या कामाचे कौतुक केले.

हरिष हजारे व कैलास कुटे सर यांनी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.वारीचे वारकरी आम्ही शिक्षक व विद्यार्थी हेच देव डोळ्यासमोर ठेवून ही वारी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे म्हणाले.संस्थेच्या सदस्य प्रियंका साठे यांनी सूत्रसंचालन केले .आभार मनीषा सुर्वे यांनी व्यक्त केले.

Previous articleशेख,सय्यद,तांबोळी,काळे,मगर यांची राष्ट्रीय मानवाधिकार पदी निवड
Next articleसह्याद्रीच्या खोऱ्यात लोकमान्य टिळकांना मानवंदना ; रॅपलिंगचा थरार अनुभवत फडकाविला तिरंगा