डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे कामकाज राजेंद्र कांचन यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट पद्धतीने चालू – खासदार डॉ अमोल कोल्हे

डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार डॉ खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते प्रदान

अमोल भोसले,उरुळी कांचन

डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे कामकाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट पद्धतीने चालू असल्याचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तर्फे राज्यातील दिशादर्शक कामकाज करणा-या सहकारी पतसंस्थांना दिला जाणारा पुणे विभागातून व्दितीय क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार सन २०१८ – १९ या आर्थिक वर्षाकरीता खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार अमोल बेनके यांच्यासह, फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व संचालक उपस्थित होते.

हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, सुभाष धुकटे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, चंद्रकांत लोणारी, बाळासाहेब कांचन, जनार्दन गोते, प्रकाश जगताप, मुख्यव्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर उपस्थित होते.

उरुळी कांचनचे भाग्यविधाते कर्मयोगी कै.डॉ मणिभाई देसाई यांच्या नावाने १९९३ मध्ये सदर पतसंस्था सुरु झाली. संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असून आठ शाखा कार्यरत आहेत, त्यापैकी ३ शाखा स्वमालकीच्या आहेत. संस्थेचे वसुल भागभांडवल ८कोटी ३३लाख असुन, ठेवी २१५ कोटी कर्जवाटप १५८ कोटी असून संस्थेने गुंतवणूक ७४ कोटी आहे. संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ मिळाला असून यापूर्वीही संस्थेस अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. संस्था सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असते. संस्था दरवर्षी विविध उपक्रम राबविते त्यास समाजातून चांगला प्रतिसाद मिळतो. कोरोना काळात जीवनावश्यक वस्तू वाटप, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत, वृक्षारोपण, मंदिर जिर्णोद्धार, वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत इ. कार्यक्रम आयोजित केले जातात.

Previous articleकोरोना महामारीच्या काळात डॉ कथे दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद : आशाताई बुचके
Next articleपुणे नाशिक रेल्वे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांचा विरोध