कोरोना महामारीच्या काळात डॉ कथे दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद : आशाताई बुचके

नारायणगाव (किरण वाजगे)

कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये डॉ. पंजाबराव कथे व प्रा. डॉ पंजाबराव कथे या दाम्पत्याचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी केले.

रोटरी क्लब नारायणगाव हायवे व डॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे मंगळवार दि. २० जुलै २०२१ रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आशाताई बुचके बोलत होत्या.

या शिबिरात ३५५ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली अशी माहिती रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे अध्यक्ष शिवाजी टाकळकर यांनी दिली . रोटरीयन प्रा.डॉ.पंजाब कथे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून सर्वसामान्यांना आरोग्यविषयक जाणवणाऱ्या समस्यांचे निराकरण होऊन त्यांना मार्गदर्शन करता यावे व आर्थिक भार पडू नये म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले.

या मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके तसेच पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माऊली खंडागळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी सदिच्छा भेट देऊन प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने आशाताई बुचके यांनी पंजाबराव कथे यांनी कोरोना महामारी च्या काळातील केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन गौरवोद्गार काढले, मागील वीस वर्षातील सामाजिक कार्याची दखल घेऊन पंजाबराव कथे यांनी मुलांसाठी केलेले ज्ञानदानाचे कार्य आणि डॉ.पिंकी कथे यांच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात केलेले सामाजिक कार्य व आर्थिक दृष्ट्या गोरगरीब व्यक्तींसाठी दिलेले आर्थिक योगदान हे माणुसकी धर्म जोपासल्या सारखे आहे असून उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पंजाब कथे आणि डॉ. पिंकी कथे यांनी केलेले कार्य हे इतरांना प्रेरणा देणारे कार्य ठरले आहे . असे गौरवोद्गार आशाताई बुचके यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

या शिबिरामध्ये पॅथॉलॉजी तपासणी, हिमोग्राम, रक्तगट, थायराइड, अस्थीरोग किंवा मणक्याचे आजार (गुडघे, कंबर, पाठ, स्लीपडिक्स इत्यादी)तसेच तोंड, स्तन, घसा व आतड्याचा कॅन्सर याशिवाय गुडघे व खांद्यांचे आजार , स्त्रीयांचे सर्व प्रकारचे आजार, पोट, मुळव्याध, ट्यूमर, हर्निया व पित्ताचे खडे, त्वचारोग, दंत तपासणी हृदयरोग तपासणी आणि विशेष म्हणजे नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया या सर्व प्रकारच्या आजारांविषयी मोफत तपासणी व मार्गदर्शन केले.

या मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी लोकमान्य हॉस्पिटल पुणे येथील तज्ञ डॉक्टर होते. यामध्ये विशेषतः डॉ. शार्दुल सोमण (स्पाइन सर्जन), डॉ. विशाल क्षिरसागर (कॅन्सर सर्जन) डॉ. शिल्पा क्षिरसागर (स्त्री- रोग तज्ञ), डॉ. ध्रुव लष्करे (आथ्रोस्कोपी), डॉ. मितेश नेमाडे (जनरल सर्जरी) डॉ.वॊशाली पोटे, डॉ. साधना गुप्ता आणि डॉ. शारदा आतकरी(स्त्रीरोग-तज्ञ) तसेच सहदेव गोळे (जनसंपर्क अधिकारी) यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच नारायणगाव व परिसरातील डॉ.इमरान शेख (डेंटिस्ट), डॉ.प्रीतम तीतर (हृदयरोग तज्ञ), डॉ. अर्चना सुरवसे तीतर (त्वचारोग तज्ञ ) यांचेही मार्गदर्शन झाले.

डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया याविषयी तपासणी व मार्गदर्शन केले. या सर्व आजारांविषयी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे संचलन डॉ कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव च्या संचालिका डॉ. पिंकी कथे (रेडिओलॉजिस्ट) व रोटरीयन प्रा. डॉ. पंजाब कथे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन व नियोजन रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे अध्यक्ष रो.शिवाजी टाकळकर,सचिव रवींद्र वाजगे, खजिनदार नंदकुमार चिंचकर, रो.अंबादास वामन, उपाध्यक्ष रो.श्रीकांत फुलसुंदर, प्रोजेक्ट डायरेक्टर शामराव थोरात यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.संपत शिंदे व सेक्रेटरी नरेंद्र गोसावी तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे व दीपक गांजाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम भालेराव, नारायण आरोटे, रामभाऊ सातपुते,सुकाजी मुळे, उमेश भालेराव, अतुल कांकरिया,शिवाजी कुमकर, उषा टाकळकर, वैशाली फुलसुंदर,अश्विनी थोरात, पुष्पलता डोंगरे,संगीता ढमाले, सीमा कुमकर ,स्वाती थोरात,मनिषा मुळे व उर्मिला वाजगे यांनी परिश्रम घेतले .

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे सर्व संचालक व सदस्य आणि डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर, पॅरामेडीकल स्टाप , कर्मचारी व स्टाप तसेच नारायणगावचे सर्व डॉक्टर्स व कर्मचारी तसेच संकेत खिलारी यांचे योगदान लाभले .या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष रो. श्रीकांत फुलसुंदर यांनी केले व आभार सचीव रो. रवींद्र वाजगे यांनी मानले.

Previous articleकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस साजरा न करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय
Next articleडॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे कामकाज राजेंद्र कांचन यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट पद्धतीने चालू – खासदार डॉ अमोल कोल्हे