नारायणगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

नारायणगाव (किरण वाजगे)

रोटरी क्लब नारायणगाव हायवे व डॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव (ता. जुन्नर जि. पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर मंगळवार (दि. २०) जुलै २०२१ रोजी आयोजित केले आहे . अशी माहिती रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे अध्यक्ष रो. शिवाजी टाकळकर यांनी दिली आहे.

रोटरीयन प्रा. डॉ. पंजाब कथे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून सर्वसामान्यांना आरोग्यविषयक जाणवणाऱ्या समस्यांचे निराकरण होऊन त्यांना मार्गदर्शन करता यावे व आर्थिक भार पडू नये म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात येत आहे.

या शिबिरामध्ये पॅथॉलॉजी तपासणी, हिमोग्राम, रक्तगट, थायराँइड,अस्थीरोग किंवा मणक्याचे आजार (गुडघे, कंबर, पाठ, स्लीपडिक्स इत्यादी)तसेच तोंड, स्तन, घसा व आतड्याचा कॅन्सर याशिवाय गुडघे व खांद्यांचे आजार , स्त्रीयांचे सर्व प्रकारचे आजार, पोट, मुळव्याध, ट्यूमर,हर्निया व पित्ताचे खडे, त्वचारोग, दंत तपासणी हृदयरोग तपासणी आणि विशेष म्हणजे नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया या सर्व प्रकारच्या आजारांविषयी मोफत तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी लोकमान्य हॉस्पिटल पुणे येथील तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहून तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.

यामध्ये विशेषतः डॉ. पल्लव भाटिया (अस्थिरोग तज्ञ), डॉ. शार्दुल सोमण (स्पाइन सर्जन), डॉ. पंकज क्षिरसागर (कॅन्सर सर्जन) डॉ. शिल्पा क्षिरसागर (स्त्री- रोग तज्ञ), डॉ. गणवीर भूषण (आथ्रोस्कोपी), डॉ. नितेश नेमाडे (जनरल सर्जरी) हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नारायणगाव व परिसरातील डॉ. श्रीकांत हांडे (एम.डी. मेडिसिन), डॉ.इमरान शेख (डेंटिस्ट), डॉ.प्रीतम तीतर (हृदयरोग तज्ञ), डॉ. अर्चना सुरवसे तीतर (त्वचारोग तज्ञ ) यांचेही मार्गदर्शन होणार आहे. आणि डॉ संदीप डोळे (मेडिकल डायरेक्टर) यांच्या माध्यमातून डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया याविषयी तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. या सर्व आजारांविषयी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे संचलन डॉ कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव च्या संचालिका डॉ. पिंकी कथे (रेडिओलॉजिस्ट) व रोटरीयन प्रा. डॉ. पंजाब कथे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक २० जुलै २०२१रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत डॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर,रचना रेसिडेन्सी, खोडद रोड, नारायणगाव येथे आयोजित केले असून या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन व नियोजन रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleनामदेवाच्या समाजसेवेमुळे गरीबांना मदत -संदिप पाटील
Next articleमंचर -खुनातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून अटक