नामदेवाच्या समाजसेवेमुळे गरीबांना मदत -संदिप पाटील

अमोल भोसले,पुणे

गरीब दुःखी,पिडीत कुटुंबाची सेवा करणारे आदिवासी समाजसेवक साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांची प्रशासनाला वेळो वेळी फार चांगले सहकार्य व मदत होत आहे,ते स्वता एक पारधी समाजातील पिडीत कुटुंबातील असुन स्वताचे दुःख आमृतागत पचवून ते रात्रंदिवस दुस-याचे दुःख कमी होण्यासाठी काम करत आहेत. नामदेव भोसले यांनी हजारो गरीब कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून दिला आहे, असे मत गडचिरोली नागपूर परित्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील सांगितले.

ते पुढे म्हणाले की नामदेव भोसले यांनी गेली विस वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्हात तंटामुक्तीच्या माध्यमातून शांतता पसरवणे,वेसन मुक्त कारेक्रम घेणे,वृक्षारोपण करणे, व हुंडा बंधी, अशा विविध कांम करत असताना आपल्या साहित्य चळवळीतून आदिवासी लोकांचे प्रश्न शासनापुढे माडून सोडवणेचा प्रयत्न केला,पारधी व पोलीस यांच्यातील चोर दरोडेखोर नावाची कलंकित दरी कमी करुन त्यांच्यात एक मैत्रीचे नाते तयार केले व शासकीय सोविधा प्रत्येक पिडीत गरीब कुटुंबातील लोकांना मिळवुन दिल्या,गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी मदत करणे, व कोरोणासारख्या महाभयंकर महामारीच्या काळात गरीबांना अन्य धान्याची मदत करुन हजोरो कुटुंबाची भुक भागवण्याचे काम मोठे केले आहे, त्यांच्या या कामामुळे प्रशासनाला फार चांगले सहकार्य झाले आहे, त्याचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या या कार्याचे आभिनंदन करावे तेवडे कमीच आहे त्याच्या कार्यास सुभेछा देतो आपण भावी काळात अशाच प्रकारे उत्कृष्ट कामकाज कराल असी आशा बाळगतो असे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील म्हणाले, या वेळी गडचिरोली नागपूर परिक्षेत्राच्या वतीने आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांना संन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Previous articleउरुळी कांचन- गणराज हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांची मोफत आरोग्य तपासणी
Next articleनारायणगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर