मंचर -खुनातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून अटक

प्रमोद दांगट निरगुडसर

मंचर मुळेवाडी (ता. आंबेगाव) येथे कैलास सोमनाथ ठाकूर या ५० वर्षीय व्यक्तीचा दोरीने गळा आवळून खून करून पसार झालेला आरोपी दिपक साळुंके उर्फ फारूक यांला स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पथकाकडून लोणावळा येथे अटक करण्यात आली आहे.

मंचर पोलिस स्टेशन हद्दीत दि. 8/7/202 ते दि. 12/7/2021 रोजी रात्री 8.30 वा. चे दरम्यान मुळेवाडी रोड मंचर येथे दीपक साळुंखे उर्फ फारुक याने कैलास सोमनाथ ठाकूर याचा कोणत्यातरी अज्ञात कारणावरून दोरीने गळा आवळून खून केल्याबाबत गुन्हा दाखल होता.दिपक साळुंके हा आरोपी खून केल्यापासून फरार होता. या आरोपीचे पूर्ण नाव व मुळगावची माहिती उपलब्ध नसल्याने तसेच आरोपी दुहेरी नाव धारण करून राहत असल्याने आरोपीचा शोध घेणे अवघड होते. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक, डॉ.अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना योग्य त्या सुचना करून यांचे मागदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथक नेमून सदर पथक हे मंचर व परिसरात आरोपीचा शोध व तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री. घनवट यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी दिपक साळुंखे उर्फ फारुख हा गुन्हा केलेपासुन फरारी आहे व तो लोणावळा परिसरात असून तो मुंबईला पळुन जाणेचे तयारीत आहे. अशी बातमी मिळाल्याने तपास पथकाचे प्रमुख स.पो.नी. नेताजी गंधारे यांचे टीमने लोणावळा शहरात सापळा रचून वेषांतर करून लोणावळा एसटी स्टँड येथून दिपक विष्णू साळुंखे उर्फ फारुख उर्फ काळू वय. ४२ ( वर्ष. मूळ. रा. कांदिवली चारकोप हिंदुस्तान नाका. मालाड वेस्ट मुंबई. सध्या रा. मुळेवाडी रोड, मंचर ता. आंबेगाव जिल्हा. पुणे ). त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ.अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,, उपविभागीय पोलीस अधीकारी अनिल लंभाते यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सपोनि. नेताजी गंधारे,पो.हवा.हनुमंत पासलकर.
पो.हवा.विक्रम तापकिर,पो.हवा. दिपक साबळे, पो. हवा. सचिन गायकवाड, पो.हवा. वाघमारे.
पो. ना. संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, पो. कॉ. निलेश सुपेकर, पो. कॉ. अक्षय जावळे यांनी केली आहे

Previous articleनारायणगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Next articleपारगाव शिंगवेत मटका चालवणार्‍यावर कारवाई