गुळाणी, वाकळवाडी गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य कु. नरेंद्र वाळुंज यांच्या वतीने मोफत फळझाडांचे वाटप

राजगुरूनगर- पर्यावरणाच्या रक्षणासाठी आज अनेक प्रकारचे प्रकल्प सुचवले जातात. वृक्षांची लागवड व जोपासना करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे या संकल्पनेतुन वाकळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य कु. नरेंद्र वाळुंज यांच्या वतीने मोफत फळझाडे गुळाणी व वाकळवाडी गावामध्ये वाटप करण्यात करण्यात आले. सिताफळ आवळा चिंच कडु निंब बांबु मोहा शिसे कांचन अशोका अशा ३००० झाडांचे वाटप करण्यात आले आले.

गुळाणी व वाकळवाडी गावातील प्रत्येक घरासमोर व शाळेच्या आवारात लागवड करण्यासाठी वाटप करण्यात आले. येत्या पावसाळ्यात घरासमोर लावण्यासाठी चांगल्या प्रतीच्या सिताफळ आवळा चिंच कडु निंब बांबु मोहा शिसे कांचन अशोका या झाडांचे ५-१० रोपटे प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले. तर शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या फुलांची व फळांची झाडे उपलब्ध करून देण्यात आली. शाळेच्या आवारातील झाडांची निगा विद्यार्थ्यांच्या मदतीने राखण्यात येणार आहे. १ जुलै ते १५ जुलै पर्यंत नोंदणी करणाऱ्या लोकांना या रोपांचे वाटप करण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम अजुन पुर्व विभागातील काही गावात राबवण्यात येणार आहे.

यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, सरपंच ज्ञानेश्वर ढेरंगे,अमोल तांबे,दिलीप ढेरंगे,वाकळवाडीचे सरपंच मंगल कोरडे,जयसिंग पवळे ,रुपाली पवळे ,कु.शिवराज्ञी पवळे, सोपान भालेकर ,सौ.शैला बांगर आदी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी राम वाळुंज , सागर चव्हाण , वेदांत पिंगळे , किरण गायकवाड , प्रतिक कोरडे ,शिवतेज सुके , सुजल पवळे यांनी विशेष सहकार्य केले.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पर्जन्यमानावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच प्रत्येकाने वर्षीतून एकतरी झाड लावावे व त्याचे संवर्धन करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन नरेंद्र वाळुंज यांनी केले

Previous articleमहाराष्ट्र राज्य सीटु (CITU)आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेची विभागीय नूतन कार्यकारिणी जाहीर
Next articleवृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हि काळाची गरज – विजयकुमार चोबे