वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हि काळाची गरज – विजयकुमार चोबे

गणेश सातव,वाघोली

वृक्षारोपण व संवर्धन हि काळाची गरज आहे.आपल्या अध्यात्म व प्राचीन धर्मग्रंथातही वृक्षलागवड व संवर्धन याबाबत आपल्या साधूसंतांनी लिहून ठेवले आहे.१६ व्या शतकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे” हा पर्यावरण संवर्धनाचा मुलमंत्र आपल्याला दिला. त्याचबरोबर शिवकाळात हि छत्रपती शिवराय आपल्या सरदारांना आपआपल्या मुलुखी कक्षेत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होण्यासाठी प्रयत्न असत.

पिंपरी सांडस ग्रामपंचायत व अखिल भारतीय ग्राहक पंचायत,हवेली तालुका यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला वृक्षारोपणचा कार्यक्रम खरचं कौतुकास्पद आहे.वृक्षारोपणाबरोबरचं वृक्षसंवर्धनाचे कार्य पुढील काळात आपल्याला करायचे आहे.असे प्रतिपादन हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी पिंपरी सांडस येथे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण व ग्राहक मेळाव्यात केले.

अनेक ठिकाणी फक्त वृक्षारोपणचा फार्स केला जातो.परंतु संवर्धनावर लक्ष दिले जात नाही.अश्या खोट्या वृक्षारोपणाचा काय उपयोग?ज्यांनी आज झाडे लावली त्यांनी भविष्यात त्या झाडाच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.

ग्राहक पंचायतीच्यावतीने पिंपरी सांडस ग्रामपंचायतीच्या ‘अस्मिता भवन’ सभागृहात आयोजित केलेल्या ‘ग्राहक संवाद’ मेळाव्याचे उद्घाटन छत्रपती शिवराय व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन करुन विजयकुमार चोबे यांच्या हस्ते ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.चोबे यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने यावेळी सन्मान करण्यात आला. नागरिकांना अवाहन केले असता अनेकांनी आप आपल्या भागातील सार्वजनिक समस्यांचा पाढा वाचला.

यावेळी मार्गदर्शनपर मनोगतात चोबे म्हणाले,पूर्व हवेलीच्या नागरी प्रशासकीय समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी मी व माझे प्रशासन कटिबद्ध असून फआगामी काळात माझ्या कारकिर्दीत शासन व प्रशासन स्तरावरुन नागरिकांच्या जेवढ्या समस्या सोडवता येईल तेवढ्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहू.

पूर्व भागाच्या अनेक गावांतील शिवरस्ता, पानंदरस्ता खुला करण्यासाठी व अन्नधान्य पुरवठा(रेशनिंग)व्यवस्थित होण्यासाठी येणाऱ्या काळात मोहीम आखू असेही यावेळी चोबे यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले.

सामान्य जनतेच्या हिताच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजक कैलास भोरडे व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा तहसीलदार चोबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच
प्रभाकर उर्फ राजुआण्णा भोरडे,अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत महसूल विभाग प्रतिनिधी रमेश टाकळकर,पुणे जिल्हा कोषाध्यक्ष राघवदास चौधरी,माजी सरपंच बाळासाहेब भोरडे,दत्तात्रय सातव,ग्रामविकास अधिकारी चव्हाण भाऊसाहेब,माजी उपसरपंच अनिल काळे, दिपक लोणारी,प्रकाश जमादार,तलाठी पवनकुमार शिवले,कृषी सहाय्यक गाडे मॅडम,हवेली तालुका अध्यक्ष संदीप शिवरकर,उपाध्यक्ष विठ्ठल ठोंबरे,सचिव कैलास भोरडे व बहुसंख्य ग्रामस्थ,शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राघवदास चौधरी यांनी केले,तर सुत्रसंचालन विठ्ठल ठोंबरे यांनी तर आभार संदीप शिवरकर यांनी मानले.

Previous articleगुळाणी, वाकळवाडी गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य कु. नरेंद्र वाळुंज यांच्या वतीने मोफत फळझाडांचे वाटप
Next articleआदर्श गोपालक पुरस्कार विघ्ने,शितोळे यांना प्रदान