महाराष्ट्र राज्य सीटु (CITU)आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेची विभागीय नूतन कार्यकारिणी जाहीर

आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना (सीटु) महाराष्ट्र राज्य यांच्या राज्य स्तरीय कार्यकारिणीची बैठक राज्य सरचिटणीस बी. टी. भामरे तसेच कार्याध्यक्ष शेवाळे सर यांच्या उपस्थित व ठाणे विभागीय अध्यक्ष गणेश गावडे, यांच्या अध्यक्षतेखाली (दि. १५) रोजी ऑनलाइन सभा संपन्न झाली.

या बैठकीत राज्यातील 10 जिल्हे कार्यक्षेत्र असणाऱ्या ठाणे विभागाची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली ती पुढील प्रमाणे

ठाणे विभागीय कार्यकारणी (सिटू)

अध्यक्ष – गणेश गावडे (घोडेगाव प्रकल्प)
उपाध्यक्ष :- श्री.पांडुरंग माळी
(घोडेगाव प्रकल्प)

श्री.वाघ (सोलापूर प्रकल्प)
श्री.अतुल माळी (डहाणू प्रकल्प)

कार्याध्यक्ष म्हाडसे (शहापूर प्रकल्प)

सचिव गोंटीलवार (जव्हार प्रकल्प)

सहसचिव – श्री पेड ( शहापूर प्रकल्प)

कोषाध्यक्ष – श्री. पांढरे ( पेण प्रकल्प)

प्रसिध्दी प्रमुख –
श्री. योगेश जगताप (जव्हार प्रकल्प)

संघटक –
श्री. दिवाने (सोलापूर)
श्री. साळुंखे (पेन)
श्री. विजय चव्हान (घोडेगाव)
श्री. नागनाथ बेनवाड(डहाणू)
श्रीमती. नाईकडे मॅडम (घोडेगाव) यांची निवड करण्यात आली आहे.

या बैठकी वेळी राज्य कार्यकारणी, तसेच सर्व प्रकल्प अध्यक्ष आणि नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.

संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल.कराड साहेब यांनी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

संघटनेचे सभासद राज्यातील आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहे मधील शिक्षक व कर्मचारी आहेत शहापूर प्रकल्प अध्यक्ष डॉ. पोगेरे यांनी सर्वांचे आभार मानले तर सूत्रसंचालन प्रा.सितापुरे यांनी केले

Previous articleराष्ट्रवादी कडून बाधित शेतकऱ्यांच्या हस्ते फित कापून नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत उद्घाटन
Next articleगुळाणी, वाकळवाडी गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य कु. नरेंद्र वाळुंज यांच्या वतीने मोफत फळझाडांचे वाटप