राजगुरुनगरच्या गिर्यारोहकांनी किल्ले अलंग-मदन-कुलंग वर फडकवला तिरंगा

राजगुरूनगर-आरोहणासाठी अती कठीण आणि दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कळसूबाई पर्वत रांगेतील दुर्ग त्रिकूट, किल्ले अलंग – मदन – कुलंग सर करून राजगुरूनगरच्या गिर्यारोहकांनी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. निसरडी वाट, वरून पडणारा पाऊस, ओले कातळकडे आणि शेवळलेल्या पायऱ्या अशी अनेक आव्हाने पार करत फोर्ट ‌‌ऍडव्हेंचर च्या गिर्या रोहकांनी ही मोहीम फत्ते केली.

आज पर्यंत मॉन्सून मध्ये या दुर्ग त्रिकूटावर आरोहण झालेल्या मोजक्याच यशस्वी मोहिमेत राजगुरू नगर च्या गिर्यारोहकांचे नाव ही समाविष्ट झाले, या मोहिमेचे नेतृत्व राजगुरुनगरचे गिर्यारोहक अक्षय भोगाडे यांनी केले होते.

विशेष म्हणजे राजगुरुनगरचे बाल गिर्यारोहक अभिनव अजित आखडे (2) आदित्य अशोक कोरडे (वय १२ वर्ष) यांनी या दुर्ग त्रिकुटांवर अभिमानाने तिरंगा फडकवित छत्रपतींना मानवंदना देऊन, गारद सादर केली. छत्तपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणावरून सोडला.

फोर्ट ऍडव्हेंचर ग्रुप, राजगुरुनगर तर्फे आयोजीत या मोहिमेत राजगुरुनगरचे अक्षय भोगाडे, अजित आरुडे, अशोक कोरडे, उषा होले, ज्योती राक्षे, रवींद्र सहाने, सचिन पुरी, रविंद्र कुंभार, अमर माने, सुहास पाटील, दिपक साळुंके, भाग्येश जाधव, संदीप राऊत, मयूर गोपाळे, दिप्ती येंधे, शांताराम गायकर हे सहभागी होते.

या गिर्यारोहकांनी ही AMK मोहिम कोविड योदयांना समर्पित केली आहे. फोर्ट ऍडव्हेंचर ग्रुप राजगुरूनगर ने आयोजीत केलेली ही अलंग- मदन- कुलंग आरोहण मोहीम सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन गिर्यारोहक तानाजी केंकरे मार्गदर्शनाखाली मुसळधार पावसात व दाट धुक्यात पार पडली.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आंबेवाडी गावातून या ट्रेकची सुरुवात होते. सुमारे तीन तासाची पायपीट करून अलग किल्ल्यापर्यंत पोहचता येते. कठीण रॉक पैच, घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर ट्रेकींग साठी कठीण आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा मुसळधार पाउस यामुळे हे किल्ले तसे उपेक्षितच आहे.

अलंग-मदन-कुलंग या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथली कठीण चढाई आणि किल्ल्यांच्या माथ्यावरील प्रशस्त पठार. त्यावर जाण्याची वाट पूर्णतः घसरडी आहे. पावसाळ्यात हा ट्रेक करणे हे ट्रेकर्ससाठी खुप मोठे आव्हान असते. सरळ कातळ कडे व उंच चढाई यासाठी या मार्गाने आरोहण करताना शारीरिक व मानसिक सहनशीलतेचा कस लागतो. दोन्ही बाजूंना खोल दऱ्या व दोराच्या सहाय्याने चढताना एक दिवसात हा ट्रेक करणे म्हणजे अशक्यच! गडाच्या माथ्यावर गेल्यावर पूर्वेला कळसूबाई, उत्तरेला हरिहर , त्र्येंबकगड, दक्षिणेला हरिश्चंद्रगड, रतनगड हा परिसर दिसतो.
सरळ उंच कातळकडे । मुसळधार पाऊस व दाट धुके यामध्ये चढाई करताना बोटांची घट्ट पकड करून घोरपडीप्रमाणे चढाई करावी लागते. ट्रेकर्ससाठी आहाना तक असणाऱ्या या त्रिकुटांचा इतिहास शोधण्याचे काम सध्या चालू आहे.

शब्दांकन : अक्षय भोगाडे, राजगुरुनगर

Previous article“रक्ताचं नातं” या उपक्रमांतर्गत नारायणगाव येथे १०२ जणांनी केले रक्तदान
Next articleशिवसेना शाखेतून जनतेचे प्रश्न सोडवा-जिल्हाप्रमुख महेश पासलकर