“रक्ताचं नातं” या उपक्रमांतर्गत नारायणगाव येथे १०२ जणांनी केले रक्तदान

नारायणगाव : (किरण वाजगे) लोकमत वृत्तपत्र समूह व लायन्स क्लब ऑफ शिवनेरी जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथील जयहिंद मंगल कार्यालयात नुकत्याच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराप्रसंगी लोकमतचे संपादक प्रशांत दीक्षित, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र पायमोडे, लाला अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अशोक गांधी, लायन्स क्लबचे अध्यक्ष संपत शिंदे, प्रोजेक्ट इन्चार्ज रंगनाथ गोल्हार, सचिन जंगम, डॉ सदानंद राऊत, शशिकांत वाजगे, जवाहर गुगळे, डॉ विलास नायकोडी, हेमंत भास्कर, मिलिंद झगडे, दीपक वारुळे, संतोष जाधव, सरपंच गणेश शेळके, योगेश पाटे, जितेंद्र गुंजाळ, डॉ, धनश्री गुंजाळ, पत्रकार सचिन कांकरिया तसेच लायन्स, लिओ क्लबचे पदाधिकारी यांनी भेटी दिल्या.

या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे ३८ व्या वेळी रक्तदान करणारे आपले प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार किरण वाजगे व रत्नदीप शिंदे यांचा तसेच पत्रकार अशोक खरात यांनी रक्तदान शिबिरामध्ये मोठे योगदान दिल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महागांव चांदखेड गणाच्या उपाध्यक्षपदी रोहिदास होजगे यांची निवड
Next articleराजगुरुनगरच्या गिर्यारोहकांनी किल्ले अलंग-मदन-कुलंग वर फडकवला तिरंगा