शिवसेना शाखेतून जनतेचे प्रश्न सोडवा-जिल्हाप्रमुख महेश पासलकर

दिनेश पवार,दौंड

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनहिताचे घेतलेले निर्णय व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांना दौंड व इंदापूर विधानसभा मतदार संघात शिवसंपर्क अभियान राबवण्यासाठी आवहान केले होते त्या अनुशंगाने आज शिवसंपर्क अभियानाची सुरवात दौंड मधून करण्यात आली.याप्रसंगी पासलकर म्हणाले की शिवसेना शाखेतून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे.


याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, शिवसेना दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, दौंड तालुका महिला संघटक छाया जगताप, स्वाती ढमाले,शिवसेना डॉक्टर सेल तालुकाप्रमुख प्रमोद रंधवे, कामगार सेना तालुकाप्रमुख चांद बादशाह शेख, उपतालुका प्रमुख नवनाथ जगताप, शिवसेना शहर संघटक अजय कटारे, शिवसेना महिला संघटक दौंड शहर दुर्गा सोनोने, विभाग प्रमुख काका परदेशी, अभिजित डाळिंबे, अजित फुटाणे, हनुमंत निगडे, उपविभाग प्रमुख डॉ.यशवंत धावडे, संजय आटोळे, शिवसेना उपशहरप्रमुख प्रसाद कदम,अक्षय घोलप,नितीन सलामपुरे, दीपक चीतारे, दौंड शहर विभाग प्रमुख गणेश झोजे, दत्ता मधुरकर, दत्ता राऊत, विनायक सोनोने, चेतन लवांडे, नासिर शेख, शिवसेना मलठण शाखाप्रमुख आबासाहेब देवकाते, पेडगाव शाखाप्रमुख शेखर शितोळे, देऊळगाव राजे ग्रामपंचायत सदस्य बाबू पासलकर, वार्ड शाखाप्रमुख बबन शेंडगे, इतर शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleराजगुरुनगरच्या गिर्यारोहकांनी किल्ले अलंग-मदन-कुलंग वर फडकवला तिरंगा
Next articleदौंड येथे गावठी दारू ची वाहतूक करणाऱ्या मारुती स्विप्ट कार सह सुमारे चार लाखाचा माल जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई