डॉ रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राचे कार्य महान-माजी सरपंच माऊली कांचन

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोना कालावधीत समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यानी आपल्या आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून अत्यल्प फी घेऊन वैद्यकीय सेवा अहोरात्र दिली. त्यामूळे अनेक खेड्यापाड्यातील रुग्णांचा अवाढव्य खर्च वाचविला. अनेक गरिब रुग्णांना शासकिय व निम शासकिय हॉस्पिटलची मदत मिळून दिली. त्यामूळे कोरोना महामारीत निरपेक्ष व समर्पित भावनेने सेवा कार्य केल्यामुळे अनेक नेशनल, इंटरनेशनल ,स्टेट व जिल्हास्तरीय नामांकने ,अवार्ड त्यांना मिळाले. तसेच डॉ मनिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट निती आयोग ,आयएसओ ,एन वाय के क्रिडा व युवक कल्याण मंत्रालय सन्लग्नीत संस्थेचे अध्यक्ष म्हणून इतर राज्यातून आलेल्या कामगारांना विविध प्रकारे मदत केली. त्यामुळे समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ‘गरिबोके मसिहा ‘ठरले. यापूर्वीही त्यानी अनेक उपक्रम रबविले असुन मराठवाडा भुकंप ,गॅस्ट्रो साथ,दुष्काळ ग्रस्त भागात वैद्यकिय सेवा केलेली असुन उरुळी कांचन येथे रुग्ण कल्याण समितीमधे कार्यरत होते.

तसेच पंचवीस वर्षे पासुन शासकीय उरुळी कांचन प्राइमरी हेल्थ सेंटर उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. हेल्थ चेक अप, शालेय तपासणी, कुस्ठ रोग दुरिकरन मोहीम , एकत्मिक बाल विकास योजना, पल्स पोलिओ मोहीम ,यशस्वी रित्या राबविली.त्याबद्दल त्यांना शासकिय मानपत्र मिळाले आहेत. ते मूकबधिर,अपंग , मतिमंत निवासी शाळेत कार्यरत असुन मोफत सेवा देत आहेत . राज्यभर अनेक सामजिक, शैक्षणिक ,निराधार ,अध्यात्मिक संस्थांमधे कार्यरत आहेत.अनेक संस्थाना संस्थात्मक कार्यास सहकार्य केलेले आहे. जागतिक डॉक्टर्स डे निमित्तने अनेक मान्यवरांनी जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. मगसेस अवार्ड विनर ,पद्मश्री डॉ मणीभाई देसाई ह्यानी खास मानपत्र बायफ येथे देऊन गौरव केलेला आहे.डॉ रविंद्र भोळे हे राज्यातील कर्मयोगी समाजसेवेचे, आरोग्य सेवेचे आदर्श घेण्यासारखे राज्यातील नामवंत समाजसेवक आहेत.

Previous articleलायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरच्या अध्यक्षपदी अंबर वाळुंज , सचिवपदी मनिष बोरा आणि खजिनदारपदी अमितकुमार टाकळकर यांची बिनविरोध निवड
Next articleटिळेकरवाडीला कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी मोहीम समारोप