टिळेकरवाडीला कृषी दिनानिमित्त कृषी संजीवनी मोहीम समारोप

अमोल भोसले,उरुळी कांचन

महाराष्ट्र शासन कृषिविभाग व जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती तथा कृषी दिनाचे आयोजन तसेच कृषी संजीवनी मोहीम समारोप व पीक स्पर्धा विजेते शेतकरी सत्कार व डाळिंब किड व रोग नियंत्रण आणि एकरी १०० टन उसाचे उत्पादन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे करण्यात आले होते.

१ जुलै कृषि दिन निमित्ताने वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेचे पुजन केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषि यांत्रीकीकरण, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सेंद्रिय भाजीपाला उत्पादन व विक्री व्यवस्थापन, सेंद्रिय शेती प्रमाणिकरण, सेंद्रिय शेती गट निर्मिती बाबत माहिती उपविभागीय कृषी अधिकारी सुनिल खैरनार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

या वेळी पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, पंचायत समिती सदस्य श्याम गावडे, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर, कृषिनिष्ठ शेतकरी बाळासाहेब चौरे, गणेश टिळेकर, सेवानिवृत्त कृषि अधिकारी संजय टिळेकर, गोरत्न पुरस्कार प्राप्त रवी लोणकर, माजी उपसरपंच सुभाष टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, आबासाहेब टिळेकर, हनुमंत घाडगे, डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ.संतोष तुपे, सोळकरे, रामदास डावखर, मेघराज वाळुंजकर, कृषि सहायक राजेंद्र भोसेकर, महेश सुरडकर, शंकर चव्हाण, अमित साळुंके, महेश महाडीक, पंचायत समिती कृषि अधिकारी अमित रनवरे, बागुल, धापते, घोगरे, संभाजी शितोळे, कचरु कड, विशाल भोसले व ग्रामस्थ शेेेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर व मंडल कृषी अधिकारी हडपसर गुलाब कडलक, ग्रामपंचायत टिळेकरवाडी खामगावटेक यांनी केले. प्रस्ताविक गुलाबराव कडलग तर सुत्रसंचालन पुरुषोत्तम काकडे यांनी केले.

Previous articleडॉ रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राचे कार्य महान-माजी सरपंच माऊली कांचन
Next articleअमोल जगताप यांचा विशेष सन्मान