लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरच्या अध्यक्षपदी अंबर वाळुंज , सचिवपदी मनिष बोरा आणि खजिनदारपदी अमितकुमार टाकळकर यांची बिनविरोध निवड

राजगुरुनगर :लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरच्या अध्यक्षपदी अंबर वाळुंज यांची, मनिष बोरा यांची सचिवपदी आणि खजिनदारपदी अमितकुमार टाकळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

लायन्स क्लब या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या राजगुरुनगर शाखेची  विशेष सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत २०२१-२२ या वर्षाकरीता नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यावेळी प्रथम उपाध्यक्षपदी डॉ. सागर गुगलिया यांची निवड करण्यात आली.

तसेच यावेळी निवडलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे : कुणाल रावळ (आंतरराष्ट्रीय निधी समन्वयक), अॅड. गिरीष कोबल (द्वितीय उपाध्यक्ष) , नितीन दोंदेकर (तृतीय उपाध्यक्ष), रमेश बोऱ्हाडे (सहसचिव), अक्षता कान्हूरकर (सहखजिनदार), डॉ. विजय आंबरे (जीएमटी विभागप्रमुख), सुरेश हडावळे (जीएलटी विभागप्रमुख), दत्तात्रय ढोरे (जीएसटी विभागप्रमुख), सदाशिव आमराळे (पीआरओ प्रमुख), विजय घोरपडे (टेल ट्विस्टर), धिरज कासवा (टेमर).

यावेळी वर्षभरात आदिवासी भागातील नागरिक व शालेय मुलांसाठी आरोग्य व इतर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी अध्यक्ष ऍड. संदीप भोसले, ऍड. अतुल घुमटकर व मिलींद आहेर, इम्रान मोमीन, किरण सावंत या संचालक मंडळ सदस्यांसह सर्व लायनेस महिला सदस्या उपस्थित होत्या. अनेक मान्यवरांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

“लायन्स क्लबला एक वैभवशाली परंपरा आहे. ‘वुई सर्व्ह’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांची सेवा केली जाईल. जिल्हा प्रांतापाल हेमंत नाईक, रिजन प्रमुख राजश्री शहा, झोन प्रमुख प्रकाश मुटके व मार्गदर्शक लायन संतोष सोनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी क्लबचा नावलौकिक वाढवू.”

~ लायन अंबर वाळुंज
(नूतन अध्यक्ष , लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर).

Previous articleपी के टेक्निकल कॅम्पस मध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग २०२१-२२ करिताचे कागदपत्र पडताळणी प्रकियेस सुरुवात
Next articleडॉ रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राचे कार्य महान-माजी सरपंच माऊली कांचन