पी के टेक्निकल कॅम्पस मध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग २०२१-२२ करिताचे कागदपत्र पडताळणी प्रकियेस सुरुवात

चाकण- उच्च व तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत डिप्लोमा इंजिनिअरिंग शै. वर्ष २०२१-२२ करिताच्या प्रवेश प्रक्रियेतील प्रमुख टप्पा असणाऱ्या कागदपत्र पडताळणी प्रकियेस सुरुवात झालेली असून सदर कागदपत्र पडताळणी करिता अधिकृत Facilitation Centre म्हणून पी के टेक्निकल कॅम्पस, चाकण महाविद्यालयास उच्च व तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत अधिकृत मान्यता मिळालेली आहे. १० उत्तीर्ण आणि ज्या १० वि मधील विद्यार्थ्यांचे ह्या वर्षाचे निकाल प्रलंबित आहेत असे सर्व विद्यार्थी सदर कोर्स करिता पात्र आहेत.

 इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या https://poly21.dtemaharashtra.gov.in/diploma21/ या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख २७/०७/२०२१ हि असून विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र व आरक्षित जागांवर प्रवेशाकरिता जातीचे प्रमाणपत्र व नॉन-क्रीमिलेयर प्रमाणपत्र गरजेचे आहे. जे विद्यार्थी २०२०-२१ मध्ये १० वि मध्ये शिकत होते अश्या विद्यार्थ्यांकरिता १० वि चे निकालपत्र आवश्यक नाही आहे.

पी के टेक्निकल कॅम्पस हि चाकण परिसरामध्ये नावारूपास आलेली शिक्षणातील एक अग्रेसर शिक्षण संस्था असून, कोरोना महामारीच्या काळातही ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम अविरत रित्या चालू ठेवले आहे. ऑनलाईन शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने मागील वर्षभर विविध उपक्रम महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आलेले आहेत व ते विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले पाहायला मिळत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे प्रवेश महाविद्यालयात सुरु झालेले असून अधिक माहितीकरिता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रतापराव खांडेभराड यांनी केले आहे. अधिक माहिती करिता महाविद्यालयाच्या www.pkinstitite.edu.in या वेबसाईट वर भेट द्यावी किंवा 9765579039/ 7721853939/ 8805369539 या क्रमांकावर संपर्क करावा.

Previous articleरेडिओलॉजिस्ट क्षेत्रांमध्ये पायोनियर ठरलेल्या डॉ. पिंकी कथे यांच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त अनोखा संदेश
Next articleलायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरच्या अध्यक्षपदी अंबर वाळुंज , सचिवपदी मनिष बोरा आणि खजिनदारपदी अमितकुमार टाकळकर यांची बिनविरोध निवड