जिल्हा परिषद शाळेचे ध्येयवेडे शिक्षक नागनाथ विभूते यांना राष्ट्रीय आयटी टीचर पुरस्कार जाहीर

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील जांभूळदरा भाम, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्येयवेडे शिक्षक नागनाथ विभूते यांना सन २०१९ चा राष्ट्रीय आयटी टीचर अवार्ड नुकताच जाहीर झाला आहे.राष्ट्रपतीच्या हस्ते वितरण होणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नागनाथ विभूते यांना महाराष्ट्र शासनाच्या ई .बालभारती च्या क्यू आर कोडेड पुस्तकासाठी तज्ञ शिक्षक म्हणून, शैक्षणिक शिखर संस्था SCERT पुणे येथे कार्य करण्याची संधी मिळाली. NCERT नवी दिल्ली येथे पुस्तक निर्मिती साठी कार्य केले.तसेच लर्निंग विथ अलेक्सा हा नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवला. तो लक्षवेधी ठरला.ऑस्ट्रेलिया देशातील मराठी शाळांशी संवाद साधला. जांभूळदरा शाळेतील विद्यार्थी ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांना मराठी शिकवतात.


शिखर संस्था SCERT पुणे येथील तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षणात रिसोर्स पर्सन म्हणून कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली.शिक्षणाची वारी नाशिक रत्नागिरी, अमरावती, लातूर येथे शैक्षणिक स्टॉल मांडून उपक्रम राज्यभर पोहोचविण्याची संधी राज्याकडून मिळाली.तसेच त्यांचीUNESCO’s च्या टीच एसडीजी अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली.त्यांना मायक्रोसॉफ्ट चा इनोव्हेटीव एज्युकेटर पुरस्कार मिळाला आहे.त्यांनी शाळेची वेबसाईट तयार केली. तसेच १२ मोबाईल एप तयार केले आहे.त्यांनी NCERT दिल्ली येथे ICT Mela – All India Children Audio Video Festival मध्ये SCERT पुणे मार्फत शैक्षणिक प्रदर्शनात सहभाग घेतला.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या समक्ष उपक्रमशील शिक्षक म्हणून सादरीकरण करण्याची संधी त्यांना मिळाली.तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण घटक संच निर्मितीत त्यांनी कार्य केले. आदिवासी विभागातील तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण TOT साठी कार्य त्यांनी केले.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान RMSA अंतर्गत काम केले.

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण (DIET) संस्था पुणे अंतर्गत पायाभूत क्षमता विकास प्रशिक्षणात काम केले.त्यांनी Pen Digitizer, Virtual Reality, Learning With Tab असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले.

शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्या मंत्रालय मुंबई येथील शिक्षण परिषदेत सक्रिय सहभाग त्यांनी घेतला.पाकिस्तान स्थित रूट इंटरनैशनल स्कूल सोबत जांभूळदरा शाळ्तील मुलांचा संवाद घडवत आंतरराष्ट्रीय शांतता राखण्यासाठी मुलांची भूमिका या विषयावर चर्चा त्यांनी घडवून आणली.शाळेत ३० लाख रू. लोकवर्गणीतून Computer Lab सुरू करण्यासाठी महत्वाची भूमिका त्यांनी घेतली.

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा ड्रोन निर्मिती टीम तयार करून विद्यार्थ्यानां ड्रोन बननण्याचे प्रशिक्षण दिले.
कोविड १९ काळात डोनेट यूअर ओल्ड मोबाईल चळवळ त्यांनी सुरू केली.

या सर्व कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला,
या साठी शालेय शिक्षण व क्रिडा मंत्री, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, जिल्हा परिषद पुणे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे, पंचायत समिती खेड यांनी अभिनंदन केले.

Previous articleसरपंच परिषदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
Next articleऔद्योगिक क्षेत्रातील भूसंपदानात भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा होण्यासाठी उद्योगमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक