औद्योगिक क्षेत्रातील भूसंपदानात भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा होण्यासाठी उद्योगमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

अमोल भोसले,उरुळी कांचन

औद्योगिक क्षेत्रातील भूसंपदानात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा होण्यासाठी उद्योगमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.


यावेळी  आमदार ॲड.अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरोग मुकादम, महाव्यवस्थापक भूसंपादन गोपीनाथ ठोंबरे, प्रादेशिक अधिकारी पुणे अविनाश हतगळ, उपविभागीय अधिकारी शिरुर संतोषकुमार देशमुख, तहसिलदार शिरुर, उद्योग विभागाचे अवर सचिव किरण जाधव, विद्यमान उपसरपंच कृष्णा श्रीकांत घावटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेत, भूखंड मोजणीपूर्वी नोटीस ७ दिवस आधी येण्याबाबत कटाक्षाने कार्यवाही व्हावी. भूसंपादनात शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला हा रेडिरेकनर दरानुसार वाढीव दराने मिळावा यासाठी उच्चाधिकारी समितीसमोर प्रस्ताव पाठविण्यासाठी महामंडळामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश दिले.

Previous articleजिल्हा परिषद शाळेचे ध्येयवेडे शिक्षक नागनाथ विभूते यांना राष्ट्रीय आयटी टीचर पुरस्कार जाहीर
Next articleखा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त जवळार्जून येथे मोफत नेत्र तपासणी