Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेगरे (ता .मुळशी ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनाबाई कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, विद्यमान उपसरपंच सुमनांजली आखाडे यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. पॅनल प्रमुख व माझी आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच मिंनाथ कानगुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत कोकरे यांची एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली.

यावेळी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनीषा मरगळे, सुमनांजली आखाडे ,फुलाबाई ढेबे ,राम बावधने, तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव कोकरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव गुजर,कोंडीबा मरगळे ,विठ्ठल मरगळे ,युवा कार्यकर्ते मल्लीक कोकरे, कमळू मरगळे ,सुनील कात्रट, पांडुरंग मरगळे ,एकनाथ दोन्हे, पैलवान दिलीप कोळेकर, व ग्रामस्थ उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संजय चव्हाण यांनी काम पाहिले तर निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच सोनाबाई कोकरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने पॅनेल प्रमुख व माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Download WordPress Themes Nulled and plugins.