थेऊर- रस्त्याच्या डागडुजीला दोन वर्षांनी सुरुवात : रस्त्याच्या कामाला न्यायालयातून स्थगिती आनल्याने या रस्त्याच्या कामास सुरुवात करता येत नव्हती- आमदार अशोक पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

रस्ता बाधीत शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामास न्यायालयातुन स्थगिती आनल्याने या रस्त्याच्या कामास सुरुवात करता येत नव्हती. गेले दोन वर्षाच्या काळात रस्त्याची दुरावस्था झाल्याने, नागरीकांना रस्त्यावरुन प्रवास करणे अवघड झाले होते. याचा विचार करुन सध्या आहे त्याच रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या सुचना सार्वजणिक बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत. तसेच न्यायालयात गेलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करुन, रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी मार्ग काढण्याबाबतही सार्वजणिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचवले असल्याची माहिती शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

रस्त्यावर पडलेल्या सुमारे एक ते दीड फुटांच्या खोल खड्ड्यांमुळे पुणे – सोलापुर महामार्गावरुन पुणे – नगर महामार्गाला जोडणारा व अष्टविनायक गणपती पैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी ये – जा साठी करण्यासाठी वापरत असलेल्या पुणे-सोलापुर महामार्ग ( थेऊर फाटा ) ते थेऊर गाव या दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अंत्यत दयनिय झाली आहे. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. या रस्त्याच्या डागडुजीस दोन वर्षानंतर सुरुवात झाली असल्याने नागरिकांसह प्रवासी व पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सुमारे ४ वर्षापुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अष्टविनायक गणपती विकास आराखड्यांतर्गत पुणे – सोलापुर महामार्ग थेऊर गाव ते केसनंद मार्गे लोणी कंद या रस्त्यासाठी १६१ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. तत्कालीन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करीत या रस्ताच्या कामाचे भुमिपुजन झाले होते. लोणीकंद ते कोलवडी या दरम्यानचे बहुतांश काम पूर्णत्वाकडे आले असले तरी थेऊर फाटा ते थेऊर गाव या रस्त्यालगतच्या ५० पेक्षा जास्त शेतक-यांनी रुंदीकरणाला विरोध करून याविरोधात उच्च न्यायालायात याचिका दाखल करुन स्थगिती दिली आहे. यामुळे या रस्त्याचे काम सुमारे दोन वर्षांपासून बंद पडलेले आहे. रस्त्यावर पडलेल्या सुमारे एक ते दीड फुटाचे खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करत वाहणे चालवावी लागत आहेत. पुणे – सोलापुर महमार्गावरुन थेऊर, कोलवडी गावात ये – जा करणाऱ्या नागरीकांना तर रोजच या त्रासास सामोरे जावे लागते. खड्यांमुुळे परिसरात २४ तास धुळीचे साम्राज्य असते. यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व या रस्त्यावकरुन येजा करणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यासाठी या रस्त्याचे लवकर काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी या रस्त्यावरुन दैनदिन प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालक, गणेश भक्त आणी स्थानिक नागरिकांची करत होते.

मिलिंद बारभाई ( सार्वजणिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता ) आमदार अशोक पवार यांच्या सुचनेनुसार जैसे थे स्थितीतच या रस्त्याची डागडुजी व डांबरीकरणास सुरुवात करण्यात आलेली आहे. रुदीकरणात जे शेतकरी बाधित होणार आहेत त्यांंचे समवेत पुढील आठवड्यात चर्चा करून त्यांना योग्य वाटेल असा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे पुढील कांही आठवड्यातच या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणही सुरु करण्याचे नियोजन सुरु केले आहे

Previous articleलोणीकंद गावच्या सर्वागीण विकासकामांसाठी सदैव कटिबद्ध-प्रदिप कंद
Next articleवेगरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनाबाई कोकरे यांची बिनविरोध निवड