अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांंवर कारवाई करण्यात हलगर्जी होणार नाही- तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील

अमोल भोसले,उरुळी कांचन

हवेली तालुक्यातील कोंढवा येवलेवाडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध हवेली महसूल पथकाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. बुधवारी वाळूने भरलेली सात आणि एक रिकामे वाहन ताब्यात घेतले.

बुधवारी सकाळी सहा वाजता हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, खेड शिवापूर मंडल आधिकारी सुर्यकांत पाटील, विकास फुके, सुर्यकांत काळे, आरती खरे, कल्याणी कुडाळ, प्रविण घुले, पाडुरंग चव्हाण आदी भरारी पथकाने कोंढव्यातील इस्कॉन मंदिराच्या परिसरात अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रक पकडले.

अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांंवर कारवाई करण्यात कुठलाही हलगर्जी होणार नाही तसेच अशा कारवाया होत राहतील वाळू तस्करांनी इथून पुढे दंडात्मक कारवाईसाठी तयार राहावे.
हवेली तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील

Previous articleसिध्देगव्हाणमध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘घर तेथे शोष खड्डा’ उपक्रमाचा शुभारंभ
Next articleपोलीस पाटील वर्षा कड यांचे कार्य कौतुकास्पद -सरपंच विठ्ठल शितोळे