पोलीस पाटील वर्षा कड यांचे कार्य कौतुकास्पद -सरपंच विठ्ठल शितोळे

अमोल भोसले,उरुळी कांचन

सामाजिक – राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिक – महिलांनी स्वतः छोट्या स्वरुपात का होईना धावपळीच्या स्पर्धेत व्यवसाय करणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांनी शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. पोलीस पाटील वर्षा सचिन कड यांचे काम कौतुकास्पद आहे कारण गावातील अचूक माहिती त्यांच्या कार्याच्या माध्यमातून समजते असे मत कोरेगावमुळ (ता.हवेली) ग्रामपंचायतचे सरपंच विठ्ठल शितोळे यांनी व्यक्त केले.

कोरेगावमुळच्या पोलीस पाटील वर्षा सचिन कड यांनी स्वतः च्या जागेत आसावरी ब्युटी पार्लर – लेडीज टेलर्सचे शाॅप टाकले असता शाॅपचे उदघाटन सरपंच विठ्ठल शितोळे – उपसरपंच मनिषा कड यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या वैशाली सावंत, अश्विनी कड, भानुदास जेधे, सचिन निकाळजे, माजी सरपंच भास्कर कड, बाळासाहेब बोधे, माजी उपसरपंच धैर्यसिंग शितोळे, संजय भोसले, आप्पा कड, वस्ताद कड, मानसिंग कड, चंद्रशेखर शितोळे, गणेश शितोळे, प्रफुल्ल पवार, जालिंदर कड, अमित सावंत, सचिन कड, लक्ष्मण कानकाटे, शरद कोलते, माजी सरपंच कविता काकडे, माजी ग्रामपंचायत सदस्या रुपाली थोरात, नंदकुमार कड, चिंतामण कड, अशोक मुरकुटे आदी उपस्थित होते.

Previous articleअनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांंवर कारवाई करण्यात हलगर्जी होणार नाही- तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील
Next articleशिरोली ग्रामस्थांचा कोरोना लसीकरणाला उत्तुंग प्रतिसाद : ३२० नागरिकांचे लसीकरण