सिध्देगव्हाणमध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘घर तेथे शोष खड्डा’ उपक्रमाचा शुभारंभ

चाकण-सिद्धेगव्हाण गावामध्ये स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आणि गावामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार, रोगराई होणार नाही यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सांडपाण्याचे निवारण,घन कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ‘घर तेथे शोष खड्डा’ हा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.


या प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी, पंचायत समिति तांत्रिक अधिकारी तायडे, ्सालुंखे विस्तार अधिकारी , साबलेंवाड़ी उपसरपंच काटकर इत्यादि मान्यवर उपस्थित होते. पर्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन बाजारे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

यावेळी संपूर्ण गावामध्ये घर तेथे शोष खड्डा हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे असे लोकनियुक्त आदर्श सरपंच साधना चौधरी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.


याप्रसंगी पंचायत समितिचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्या हस्ते गावातील १०० कुटुंबांना मोफत सेंद्रिय परसबाग बियाणे पर्याय प्रतिष्ठानच्या वतीने वाटप करण्यात आले.

यावेळी महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच सत्यवान काळे आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष किसन देशमुख यांनी तर ग्रामसेवक छाया साकोरे यांनी आभार मानले.

Previous articleसावरदरीचे सरपंच भरत तरस यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामे आणि लोकोपयोगी कामे करण्याचा धडाका
Next articleअनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांंवर कारवाई करण्यात हलगर्जी होणार नाही- तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील