फीमुळे मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

अमोल भोसले,उरुळी कांचन

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल शिवले यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद आयुष प्रसाद व शिक्षणअधिकारी यांना विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

कोणत्याही विद्यार्थ्यांना फक्त फी न भरल्याच्या कारणास्तव शैक्षणिक फायद्यापासून वंचित ठेवले जाऊ नये. फी भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी निर्दिष्ट केल्याप्रमाणे सुलभ हाफ्याने फी भरण्याची मुभा मिळावी. उशिरा फी भरणार्‍या पालकांवर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक दंड आकारू नये. ऑनलाईन क्लासरूम मधुन विद्यार्थ्यांंना काढले जाऊ नये (यामुळे विद्यार्थ्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होत आहे.) शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्याची गुणपत्रिका तसेच शाळा सोडल्याचा दाखला अडवणे असे प्रकार होणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी. गेल्या १ वर्षात यदाकदाचित आपल्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याच्या घरातील कर्ता पुरुष कोविड मध्ये वारले असतील अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात यावी. यामागण्यांच्या उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. आपल्या संस्थेच्या संबंधात काही तक्रार आम्हाला प्राप्त झाल्यास आपल्या विरोधात नाईलाजाने आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल अशी मागणी पुणे ग्रामीण च्या सर्व शाळेत करण्यात येणारआहे. अशी माहिती भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे अमोल शिवले यांनी दिली.

या वेळी पुणे जिल्हा विद्यार्थी सरचिटणीस विपुल मांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष संकेत पासलकर, निलेश कोंडे, रामनाथ शेटे, शुभम तुपे व इतर उपस्थित होते.

Previous articleतालुक्याच्या प्रशासकीय इमारती एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करणार – आमदार अशोक पवार
Next articleविविध सामाजिक उपक्रम राबवून शिवसेना उपतालुकाप्रमुख पै.विष्णुदास उर्फ बाप्पुसाहेब थिटे (राजगुरु केसरी) यांचा वाढदिवस साजरा