तालुक्याच्या प्रशासकीय इमारती एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करणार – आमदार अशोक पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरुर हवेलीचे आमदार ॲड् अशोक पवार यांनी सोरतापवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. सदर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायत हद्दीत नियोजन केलेल्या विकासकामांसाठी विविध खात्यांमधून निधीची तरतूद तसेच राबविण्यात येणाऱ्या विकास आराखड्यासंदर्भात ग्रामपंचायत प्रतिनिधींची बैठक घेतली.

बैठकी दरम्यान हवेली तालुक्याच्या महसूल प्रशासनाचे विभाजन झाल्यानंतर पूर्व हवेली तालुक्यातील महसूल मंडळाचा समावेश असलेले अप्पर तहसील कार्यालय, पंचायत समिती कृषी विभागाची शाखा, सहाय्यक निबंधक कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशासकीय इमारतीत एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

याप्रसंगी सरपंच संध्याताई चौधरी, उपसरपंच निलेश खटाटे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष सोनबा चौधरी, डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, रंगनाथ कड, राष्ट्रवादी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शंकर कड, सनी चौधरी, रवी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या सुप्रियाताई चौधरी, युवा नेते अमित चौधरी आदींची उपस्थिती होती.

Previous articleग्रामोन्नती मंडळाचे नारायणगाव महाविद्यालय व रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने गुगल मीट द्वारे अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
Next articleफीमुळे मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन