विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवसेना उपतालुकाप्रमुख पै.विष्णुदास उर्फ बाप्पुसाहेब थिटे (राजगुरु केसरी) यांचा वाढदिवस साजरा

राजगुरूनगर- शिवसेना उपतालुकाप्रमुख पै.विष्णुदास उर्फ बाप्पूसाहेब थिटे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने विष्णुदास(बाप्पूसाहेब) थिटे मित्र परिवार आणि बजरंग दल,शिवसेना खेड तालुका व शिवशंभु छावा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

तालुक्यातील बहुळ व वाफगाव या दोन गावांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर शेलपिंपलगाव, ठाकूर पिंपरी आणि पूर येथील अनाथाश्रम व वृद्धाश्रमात किराणा,अन्नधान्य आणि फळे व खाऊवाटप आणि कोयाळी येथील गोशाळेस हिरवा चारा देऊन कुठल्याही प्रकारचा डामडौल न करता एक आदर्श पुर्वक जन्मदिवस साजरा करण्यात आला.


ऑक्सिजनचे महत्व ओळखून तालुक्यातील शेलपिंपळगाव, ठाकुर पिंपरी व कनेरसर (पूर)अशा अनेक गावांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले

रक्तदान शिबिराचे उदघाटन चाकण पोलीस ठाण्याचे पीएआय झेंडे,बहुळ गावचे सरपंच गणेश वाडेकर, सिद्धेगव्हाणचे मा.सरपंच सत्यवान काळे, वाफगावचे सरपंच रामाणे, गुळाणी गावचे सरपंच माऊली ढेरंगे व उपसरपंच अमोल तांबे तसेच भरत पवळे, मनोहर गोरगल्लेे व संंतोष दौंडकर (मा.विभाग प्रमुख),अमित लंगोटे यांच्या हस्ते झाले.दोन्ही ठिकाणी मिळुन या कोविड आणि लसीकरणाच्या काळात सुद्धा विक्रमी असे 134 रक्तदात्यांचे रक्तदान झाले.


या वेळी संदिप साबळे, अनिकेत वाडेकर,पांडुरंग पानसरे,संतोष वाडेकर,शैलेश काटकर,नवनाथ मोरे,सिद्धांत थिटे, अनिकेत दौंडकर, आकाश दौंडकर,प्रदीप दौंडकर,तुषार थिटे,अनिरुद्ध थिटे,संतोष थिटे, बाळासाहेब पानसरे,बाळकृष्ण तांबे,अभय साबळे,चंद्रकांत खलाटे, संकेत कानपिळे, अभिषेक माने,ओंकार सोनार,संकेत आर्विकर,निखिल रणपिसे,सागर मोहिते, जीवनआप्पा औटी, अरूण मोहिते,विकास मोहिते,राजेश शिंदे,अभिजित शिंदे,श्रीकांत शिंदे,ॠषिकेश चव्हाण, अॅड.सचिनजी साबळे,सागर साबळे,वैभव साबळे,प्रविण साबळे व इतर मित्र परिवार व रेटवडी पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleफीमुळे मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
Next articleकुंजीरवाडीत पाच किलो गांजा पकडला