आलेगाव- धुमाळवस्ती येथे अँटीजेन तपासणी शिबीर

दिनेश पवार,दौंड

आलेगाव धूमाळवस्ती येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ॲन्टींजेन टेस्ट शिबिरास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिरास सुरुवात करण्यात आली, ग्रामीण भागातील कोरोना चे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून आवश्यक ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे .

यावेळी येथील जि.प शाळेच्या दूरूस्तीच्या ५ लक्ष रूपयांच्या कामाची पाहणी वीरधवल जगदाळे यांनी केली.

यावेळी सरपंच तृप्ती काळे, उपसरपंच अनिता धूमाळ, शिवाजीराव काळे,अशोकराव कदम,डॉ.राजेश पोतन, मुख्याध्यापक खताळ मॅडम,
पोलिस पाटील योगेश बोबडे,
वसंत धुमाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक ग्रामस्थ,तरूण सहकारी उपस्थित होते.

Previous articleपै.गणेश बोत्रे यांच्या प्रयत्नांतून मेदनकरवाडीच्या ठाकरवाडीत पोहचली वीज
Next articleदेऊळगाव राजे येथे जनावरांचे रक्त तपासणी केंद्र सुरू करा- अभिमन्यू गिरमकर