देऊळगाव राजे येथे जनावरांचे रक्त तपासणी केंद्र सुरू करा- अभिमन्यू गिरमकर

दिनेश पवार,दौंड

देऊळगाव राजे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांचे रक्त तपासणी केंद्र सुरू करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी चे किसान मोर्चा दौंड तालुका अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या मागणीचे निवेदन दौंड चे आमदार राहुल कुल,दौंड तहसीलदार, गटविकास अधिकारी,यांच्याकडे सादर करण्यात आले आहे, देऊळगाव राजे येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 कार्यरत आहे,येथे किंवा परिसरात कोठेही जनावरांचे रक्त तपासणी लॅब नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांचे गंभीर आजाराचे निदान करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे,या गैरसोयीमुळे जनावरांच्या मृत्यू चे प्रमाण देखील वाढले आहे, लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांची होणारी दूर करावी असे या निवेदनात म्हटले आहे.यावेळी पोलीस पाटील योगेश बोबडे,पहाणे,ढवळे उपस्थित होते

Previous articleआलेगाव- धुमाळवस्ती येथे अँटीजेन तपासणी शिबीर
Next articleगोरखगडावर फडकाविला तिरंगा “द फ्लाइंग सिख” मिल्खा सिंग यांना वाहिली श्रद्धांजली