पै.गणेश बोत्रे यांच्या प्रयत्नांतून मेदनकरवाडीच्या ठाकरवाडीत पोहचली वीज

चाकण- गेल्या अनेक वर्षांपासून मेदनकरवाडी ( ठाकरवाडी) या ठिकाणी प्रलंबित असणारा विजेचा प्रश्न पै.गणेश बोत्रे यांच्या सहकार्यातुन महावितरणच्या अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार व पाठपुरावा करून लाईटचे पोल टाकण्यात आले.गेल्या दहा वर्षांपासून अंधारात असणाऱ्या वस्तीवर प्रकाश आणण्याचे काम जनसेवक गणेश बोत्रे यांनी केले.

या कामासाठी महावितरणचे अधिकारी राहुल डेरे, मेदनकरवाडीचे माजी सरपंच महेंद्र मेदनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


यावेळी उपसरपंच गणेश भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य संजयभाऊ वाघमारे, संदिप मेदनकर, भगवान मेदनकर, शेखर मेदनकर, संभाजी मेदनकर, डॉ विजय मेदनकर, अमित मेदनकर, अजित मेदनकर,गणेश मेदनकर, मयुर मेदनकर, ओंकार मेदनकर, राहुल कडे, पप्पू आरूडे आदी उपस्थित होते.

Previous articleएक निश्चय प्रकल्पांतर्गत गरजुंना मदत
Next articleआलेगाव- धुमाळवस्ती येथे अँटीजेन तपासणी शिबीर