क्रांती गाढवे यांची सरपंच सेवा महासंघाच्या पुणे महिला जिल्हाध्यक्षापदी नियुक्ती

घोडेगाव -सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्यच्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत घोडेगाव येथील सरपंच सौ क्रांती प्रशांत गाढवे यांची पुणे महिला जिल्हाध्यक्षा म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत संघटना आहे. आज पर्यंत राज्य कार्यकारिणी ने शासनस्तरावर विविध मागण्या मंजूर करून घेतल्या हे उल्लेखनीय आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव ग्रामपंचायत पंचायत हि सर्वात मोठी समजली जाते, येथील सरपंच सौ. क्रांती प्रशांत गाढवे त्यांच्या कामाचा संघटना वाढीसाठी अनुभव बघता त्यांच्या खांद्यावर पुणे महिला जिल्हाध्यक्षा पदाची जबाबदारी राज्य कार्यकारिणी च्या सल्ल्यानुसार सरपंच सेवा महासंघ संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम अंबादास घोगरे, राज्य मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, राज्य संपर्कप्रमुख राहुल मारोतराव उके, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देउन जिल्हाध्यक्षा पदाची जबाबदारी देण्यात आली . ते आपल्या नियुक्ती चे श्रेय सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राज्याअध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, राज्य सल्लागार हनुमंत सुर्वे, राज्य संघटीका ज्योती अवघड, राज्य कार्यकारिणी सदस्य सतिश साखरे, भाऊसाहेब गिराम सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर, सरपंच माझा चे संचालक रामनाथ बोर्हाडे यांना देत आहे .त्यांच्या नियुक्ती मुळे सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव व स्वागत होत आहे

Previous articleबारामती इको सिस्टिम्स् प्रा.लि. कंपनीचा “बायोगॅस”संयत्र ऊत्पादन क्षेत्रामध्ये मध्ये कार्यरत-अभिमन्यु नागवडे
Next articleएक निश्चय प्रकल्पांतर्गत गरजुंना मदत