एक निश्चय प्रकल्पांतर्गत गरजुंना मदत

राजगुरूनगर – रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर,रोटरी क्लब ऑफ निगडी आणि रोटरी क्लब ऑफ विबवेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “एक निश्चय” या प्रकल्पाअंतर्गत कोरोना काळात अडचणीत असलेल्या गरीब आणि गरजु १०० कुटुंबांना प्रत्येकी एक हजार रुपये किमतीचे किराणा किट वितरीत करण्यात आले.

एस जी ॲनॅलिटिक्स या कंपनीच्या सी एस आर फंडातुन या तिनही क्लबचे माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला.

या प्रकल्पाचे समन्वय सुशांत गुप्ता आणि प्रकल्प प्रमुख म्हणुन असि. गव्हर्नर अविनाश कहाणे आणि विजय काळभोर यांनी काम पाहिले.

रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष प्रविण घाणेगावकर आणि सेवा प्रकल्प प्रमुख मुकुंद मुळे यांच्या सह या क्लबचे सदस्य केशव मानगे , अजित कोठारी , सुयोग जबुवानी ,जगन खिंवसरा, धिमही पटेल,कल्पना कहाणे उपस्थित होते.

रोटरी क्लब राजगुरुनगरचे अध्यक्ष राहुल वाळुंज व सचिव चक्रधर खळदकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

यावेळी नरेश हेडा,अजित वाळुंज ,दत्ता रुके, संजय कडलग , जयंत घोरपडे , अविनाश कोहिनकर ,सुधीर येवले , माजी जि प सदस्य अनिलबाबा राक्षे, कैलास दुधाळे आदी उपस्थित होते.

लाभार्थींनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.भविष्यात असेच समाजपयोगी उपक्रम राबवण्याचा मनोदय या तिनही क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केला.

Previous articleक्रांती गाढवे यांची सरपंच सेवा महासंघाच्या पुणे महिला जिल्हाध्यक्षापदी नियुक्ती
Next articleपै.गणेश बोत्रे यांच्या प्रयत्नांतून मेदनकरवाडीच्या ठाकरवाडीत पोहचली वीज