बारामती इको सिस्टिम्स् प्रा.लि. कंपनीचा “बायोगॅस”संयत्र ऊत्पादन क्षेत्रामध्ये मध्ये कार्यरत-अभिमन्यु नागवडे

 अमोल भोसले,उरुळी कांचन

“बायोगॅस ज्याच्या घरी, आरोग्य तेथे वास करी”
पारंपारीक पद्धती मध्ये चुलीवर स्वयंपाक करताना होणारा धूर, काळी पडणारी भांडी, ती स्वच्छ करण्यासाठी करावा लागणारा खटाटोप, धुरामूळे काळे पडणारे घर, त्याची करावी लागणारी स्वच्छता, आणि या बायोगॅस संयंत्रा मुळे पाहिजे त्या वेळेस तयार होणारे इंधन यामुळे व आजार या सर्वांपासून “ग्रामीण” भागातील महिलांची सुटका झाली आहे. बारामती इको सिस्टिम्स. प्रा.लि.संचालक अभिमन्यु नागवडे यांनी दिली.

बारामती इको सिस्टिम्स प्रा.लि च्या बायोगॅस मध्ये जनावरांच्या शेणा पासून, पोल्ट्री वेस्ट. फूड वेस्ट. या पासून मिथेन गॅस ची निर्मिती केली जाते तसेच हा गॅस स्वयंपाका साठी वापरता येतो. हा उपक्रम राज्य सरकार मार्फत राबविण्यात येणार्या स्वच्छतेच्या योजना जसे “स्वच्छ भारत अभियान”, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम, पर्यावरण स्वच्छता अभियानांस पूरक आहे.
मिथेन गॅस चा घरगुती गॅस इंधन म्हणून वापर करणे आता समयसिद्ध संकल्पना ठरली आहे.

जगप्रसिद्ध बारामती इको सिस्टिम्स प्रा.लि.कंपनीने खुप अनुभवामधुन बायो गॅस संयंत्र बनवले असल्यामुळे बायोगॅस संयंत्रा बाबत कसलीही शंका, अडचण, उरली नाही. बारामती इको सिस्टीम्स् चे बायोगॅस संयंत्र पूर्ण पणे तयार असल्यामुळे १ तासात बसवता येते, त्या साठी बांधकाम लागत नाही. त्या मुळे जागा, वेळ, त्रास व पैशाची बचत होते. बारामती इको सिस्टिम्सचे बायोगॅस संयंत्र LLDPE / HDPE मध्ये तयार केले असल्यामुळे गंजणे, गळती होणे याची भीती नाही. तसेच वजणास हलके असून देखभालीस सुलभ आहे.

बारामती इको सिस्टिम्सचे बायोगॅस संयंत्र. २ घनमीटर प्रतिदिन क्षमता
आपण २ घनमीटर प्रतिदिन क्षमता गॅस देण्याची असलेल्या संयंत्रा चा विचार करू,
बारामती इको सिस्टिम्स् प्रा.लि.या कंपणीच्या बायोगॅस साठी २५ ते ४० किलो ग्रॅम शेणाची ( २ ते ३ जनावरांचे शेण ) आवश्यकता असते, व या पासून एका कुटुंबातील ८ ते १० जणांचा स्वयंपाक, नाष्टा, पाणी गरम करणे अशा अनेक गोष्टी होऊ शकतात.

बारामती इको सिस्टिम्स् प्रा.लि.चे बायोगॅस संयंत्र हे खर तर या संयत्राला जैविक खत उत्पादक संयंत्र असेच म्हटले पाहिजे कारण, या पासून सर्वोत्कृष्ट दर्जाचे जैविक खत उत्पादित होते व हे उत्पादन मुख्य आहे, तर गॅस हे दुय्यम उत्पादन होय.
रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे जमिनीचे आरोग्य खालावण्यासह शेतीमधील उत्पादन घटण्याच्या समस्येला आज अनेक शेतकरी तोंड देत आहेत. अशा जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी नामांकित बारामती इको सिस्टिम्स प्रा.लि. कंपनीने बारामती इको सिस्टिम्स् बायोगॅस संयंत्र LDPE / HDPE मध्ये तयार केले आहे.
बारामती इको सिस्टिम्स् बायोगॅस संयंत्रातून निघालेली स्लरी म्हणजे उकिरड्यातल्या शेणाच्या जवळ जवळ ३ पट प्रभावी असते.

बारामती इको सिस्टिम्स् प्रा.लि.चे बायोगॅस २ घनमीटर प्रतिदिन क्षमता गॅस देण्याची असलेल्या संयंत्रा पासून प्रती माह २ गॅस सिलेंडर, किंवा ३५ लीटर केरोसिन (रॉकेल) किंवा १५० ते २०० किलो ग्रॅम लाकडाची बचत होते.

शेतीसाठी सर्वोत्कृष्ट दर्जाचे जैविक खत २००० ते २४०० लीटर स्लरी द्वारे मिळते.
NPK चा विचार करता १० पोती यूरिया + ३५ पोती सुपरफॉस्पेट + ५ पोती म्युरेट ऑफ पोटॅश हे मिळते. या पासून शेतीचा पोत सुधारण्यास मदत होते.

बारामती इको सिस्टिम्स् प्रा.लि.चे बायोगॅस संयंत्र बसवण्यासाठी ४ फूट खोल ६ फूट व्यासाचा खड्डा खोदावा लागेल. खड्डा खोदने अवघड किंवा खर्चिक असेल तर बारामती इको सिस्टिम्स् प्रा.लि.चे बायोगॅस संयंत्र जमिनीवर बसवता येते.बारामती इको सिस्टिम्स् प्रा.लि.च्या बायोगॅस संयंत्रा सोबत २ बर्नरची शेगडी, ५० फुट पाईप व इतर आवश्यक सामग्री फिटिंगसह.

अधिक माहिती साठी संपर्क : अभिमन्यु नागवडे
बारामती इको सिस्टिम्स.प्रा.लि.
9527233999 / 9527730999

Previous articleनवनाथ वायकर यांच्या माध्यमातून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षा कवचच्या रुपाने मदत-आमदार अशोक पवार
Next articleक्रांती गाढवे यांची सरपंच सेवा महासंघाच्या पुणे महिला जिल्हाध्यक्षापदी नियुक्ती