खरपुड येथे किराणा किटचे वाटप

राजगुरूनगर-खरपुड येथे कार्यरत असलेली कल्पवृक्ष संस्था पुणे यांचे सहकार्याने खरपुड व म्हसेवाडी येथिल आदिवासी भागातील 150 पेक्षा जास्त गरजू कुटुंबांना प्रत्येकी एक हजार पेक्षा जास्त किंमतीचे किराणा किट वाटप करण्यात आले.


यावेळी कल्पवृक्ष संस्थेच्या वतीने प्रदीप चव्हाण, सुभाष डोळस, मंदाताई काठे, खरपुड गावच्या पोलीस पाटील सौ. संगीताताई सुरेश भोकटे, उप सरपंच बाळासाहेब मदगे, सरपंच सौ. यमुनाबाई राजू मदगे, ग्रा. सदस्य सुरेश भोकटे, रमेश भोकटे तसेच खरपुड व म्हसेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच मागील कोरोना काळात संस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले होते.


यावेळी कल्पवृक्ष संस्थेचे प्रदीप चव्हाण यांनी कोरोना काळात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.

Previous articleचोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेले जेरबंद
Next articleसरपंच सेवा महासंघाच्या हवेली तालुकाध्यक्षपदी सुरज चौधरी यांची निवड