चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेले जेरबंद

चाकण- आंबेठाण चौकाजवळील उड्डाण पुला खाली दोन व्यक्ती चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती त्यानुसार चाकण पोलिसांनी सापळा रचून दोघांना दुचाकी सह ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांनी दिली

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,दोन जण चोरीच्या मोटारसायकल विक्री साठी चाकण मध्ये येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपुत यांना मिळाली होती त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला सुचना देण्यात आला त्यानंतर पोलीस पथकाने आंबेठाण चौका जवळील उड्डाण पूलाच्या ठिकाणी सापळा लावला असता दोन व्यक्ती दोन वेगवेगळया मोटार सायकलींवरून येत असल्याचे निदर्शनास आले, या दोंघावर पोलीसांना संशय आला त्यांची विचारपूस करताच ते पळ काढू लागले असतांनाच त्यांना पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले..

भाउसाहेब गंगाराम दुधवडे (वय १९ वर्षे ) भाउसाहेब सिताराम दुधवडे ( वय १९ ,वर्षे दोन्ही रा. म्हसोबा झाप ता. पारनेर जि. अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे

त्यांचकडे अधिक तपास केला असता आरोपींनी आणखी दोन चोरीच्या मोटार सायकलीची चोरी केली आल्याची माहिती दिली असून त्यांच्याकडुन एकुण सुमारे एक लाख रूपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत..

होंडा ॲक्टिवा एम एच १२ सी जी ३५२७, हिरो होंडा स्प्लेंडर एम एच १४ ए आर ४५९८, हिरो होंडा स्प्लेंडर एम एच १४एम डी ४२५८ हिरो पॅशन नं. एम एच १७ ए एक्स ४२९६ या नंबरच्या दुचाकी आरोपींकडून जप्त करण्यात आल्या आहेत

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ मंचक इप्पर, सह पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवरे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, विजय जगदाळे, सोमनाथ झेंडे, सुरेश हिंगे, हनुमंत कांबळे, संदिप सोनवणे, जयदिप सोनवणे, नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, विलास कांदे, रेणुका माने यांनी केली.

Previous articleऊरुळी कांचनमध्ये जुगार अड्ड्यावर छापा
Next articleखरपुड येथे किराणा किटचे वाटप