खूनाच्या गुन्ह्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ठोकल्या बेडया

अमोल भोसले,उरुळी कांचन

खुनाच्या गुन्ह्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अकलूज (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथून मंगळवारी (ता. १५) अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. याआगोदारच सदर गुन्हयातील ३ आरोपींना अटक करण्यात आले होते.

अजय उर्फ प्रदिप प्रकाश खरात (वय २०) आणि प्रमोद प्रताप खरात (वय २१) दोघेही रा.माळशिरस जि.सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार , बावडा-गणेशवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत संजय महादेव गोरवे (वय २८) याचा १७ जानेवारीला खून झाला होता. तर त्याची ओळख पटु नये, याकरीता त्याचे दोन्ही हात, पाय व डोके कापून त्याचा मृतदेह (धड) भिमानदीच्या पात्रात फेकुन दिला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी वरील दोन्ही आरोपींना पकडण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाला अजय खरात आणि प्रमोद खरात हे अकलूज (जि.सोलापूर) येथे मंगळवारी (ता. १५) येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला. या सापळ्यात वरील दोन्ही आरोपी अलगत अडकले.

दरम्यान, अजय खरात आणि प्रमोद खरात हे सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अकलूज (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथून दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने पकडले आहे. दोन्ही आरोपींची वैदयकिय तपासणी करुन त्यांना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख आणि बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे,पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत,जनार्दन शेळके, गुरु गायकवाड,अभिजित एकाशिंगे,राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ आणि काशिनाथ राजापुरे यांच्या पथकाने केली.

Previous articleवेदिकाला इंजेक्शन दिले अन् कष्टाचं चिज झालं..खासदार डॉ अमोल कोल्हे
Next articleखेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर ढोरे, सचिवपदी सुरेश घनवट यांची बिनविरोध निवड