खेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर ढोरे, सचिवपदी सुरेश घनवट यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर- खेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या सन २०२१ ते २०२६ या पंचवार्षिक कालावधीसाठीची कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी शंकर ढोरे , सचिवपदी सुरेश घनवट यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शरद ढोले, कैलास खेसे,यशवंत डोळस व बाळासाहेब मतकर यांनी कामकाज पाहिले.

नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष शंकर ढोरे, उपाध्यक्ष तुषार साळुंखे,सचिव सुरेश घनवट,कोषाध्यक्ष मोनिका गुंजाळ, सहसचिव तृप्ती झरेकर, सदस्यपदी खंडू खैरे, लालुसाहेब बांबळे, पूनम चव्हाण, नीलिमा जाधव यांचा समावेश आहे.

पदाधिकारी निवडीनंतर सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. ग्रामसेव बाळासाहेब माने, ज्ञानेश्वर पावडे, बाळासाहेब मतकर, शीतल लकारे,सुदाम कड आदी उपस्थित होते.

Previous articleखूनाच्या गुन्ह्यातील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ठोकल्या बेडया
Next articleराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेची गरजूंना मदत