क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड यांच्याकडून कोरोना संरक्षक किटचे वाटप

नारायणगाव (किरण वाजगे)

कोरोणा विषाणू च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात अनेक नागरिक संक्रमित होत आहेत. या आजाराच्या संक्रमणपासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकारने प्रत्येक नागरिकाला मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे सुचवले आहे.


या अनुषंगाने कोविड – १९ च्या महामारी च्या काळामध्ये पोलिस, सफाई कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, महसूल कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, असे बरेच कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. म्हणूनच क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड संस्थेने समजिक बांधिलकी म्हणून संपूर्ण देशात ज्या ठिकाणी कंपनी शाखा आहे त्या ठिकाणच्या कोरोना योद्धा यांना कोरोना संरक्षक सामग्री मोफत वाटप करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नारायणगाव शाखेकडून आज नारायणगाव व जुन्नर पोलिस स्टेशन या ठिकाणी फेस मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायझर, सॅनिटायझर फूट स्टँड, इंफारेड थरमोमीटर या सामग्रीचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी नारायणगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे ,जुन्नर चे पोलीस विकास जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल डी लोंढे , पोलीस नाईक ‌‌बी,आर हिंगे, पो. नाईक श्याम जवळे, कंपनीचे कर्मचारी एरिया मॅनेजर धीरज देशमुख, नारायणगाव शाखेचे शाखाधिकारी सचिन गुरप, अभिजीत कांबळे, वैभव तायडे, पवन प्रधान, महादेव टाकसाळ, राहुल पवार, अमोल जांभळे उपस्थित होते.

Previous article११ दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद
Next articleआमदार अशोक पवार यांच्या संकल्पनेतून कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सरपंच विठ्ठल शितोळे