आमदार अशोक पवार यांच्या संकल्पनेतून कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सरपंच विठ्ठल शितोळे

अमोल भोसले,उरुळी कांचन

लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग, प्रशासन, ग्रामपंचायत, लोकसहभागच्या वतीने कोविड सेंटराच्या माध्यमातून रुग्णांना याठिकाणी अतिशय चांगली सेवा देण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांनीही भविष्यात आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन यांनी केले. कोरोना बाधित रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने कोविड केअर सेंटर बंद करीत असल्याची माहिती कोरेगावमुळचे सरपंच विठ्ठल शितोळे यांनी दिली.

शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांनी पुढाकार घेत रावलक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून कोरेगावमुळ (ता.हवेली) ग्रामपंचायत, उरुळी कांचन – सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातील गरजुवंत रुग्णासाठी कोरेगावमुळ इनामदार वस्ती वरील यशोदा मंगल कार्यालय याठिकाणी कोविड केअर सेंटरची उभारणी केली होती. त्याला अनेक सेवाभावी सामाजिक संस्थानी तसेच हॅप्पी गुप्रनी व ग्रामस्थांनीही उस्फूर्तपणे प्रतिसाद देत धान्य, फळे, किराणा मदत देऊ केली. यामुळे येथील रुग्णांना चांगला नाष्टा, चांगले जेवण मिळाले. सुमारे ४५ रुग्ण याठिकाणी उपचार घेऊन सुखरुप घरी गेले. यावेळी डॉक्टर, ग्रामपंचायत कर्मचारी, आजारी, यशोदा मंगल कार्यालयाचे मालक अमोल भोसले यांचा सन्मान वृक्ष देऊन करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधिकारी डॉ. सुचिता कदम, सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच मनिषा कड, पोलीस पाटील वर्षा कड, ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेधे, मंगेश कानकाटे, दत्तात्रय काकडे, सचिन निकाळजे, अश्विनी कड, संतोष काकडे, अमित सावंत, प्रविण शितोळे, ग्रामविकास अधिकारी विराज पवार, दिलीप शितोळे, भाऊसाहेब चौधरी, शुभम काळे, प्रशांत कोतवाल, संदीप गायकवाड, सुहास पवार, निलेश जाधव, सचिन कड, हनुमंत महाडिक, सुरेश वाळेकर, नंदकुमार कड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश वाळेकर यांनी केले तर आभार विराज पवार यांनी मांडले.

Previous articleक्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड यांच्याकडून कोरोना संरक्षक किटचे वाटप
Next articleडिझेलची चोरी करणारी टोळी जेरबंद