दूध दरवाढीसाठी दुधाने अंघोळ करून निषेध

दिनेश पवार,दौंड

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली रयत क्रांती संघटनेच्या वतीने कानगाव (ता. दौंड) येथे दूध दर वाढीसाठी दुधाने अंघोळ करून अनोख्या पध्दतीने सरकारचा निषेध करण्यात आला, दूध उत्पादक शेतकरी संतोष गायकवाड यांच्या गोठयात रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी दुधाने अंघोळ करून सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून उपस्थित दूध उत्पादकानी यावेळी निषेध व्यक्त केला.


राज्यात दररोज दोन कोटी लिटर दुधाचे उत्पादन शेतकरी करतो परंतु याला योग्य बाजारभाव मिळत नाही, दुधापेक्षा पाणी महाग झाले अशी अवस्था झाली आहे, गुरांच्या खाद्याचे भाव गगनाला भिडले आहे प्रचंड महागाई वाढली आहे मात्र दुधाला भाव दिला जात नाही अशी खंत यावेळी दूध उत्पादकानी व पदाधिकारी यांनी व्यक्त केलीरयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे,जिल्हा सरचिटणीस सयाजी मोरे, शेतकरी संतोष गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत गायकवाड,नंदकुमार गवळी,सोमनाथ कोलते व दूध उत्पादकांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Previous articleसावरदरीत 18 वर्षावरील नागरिकांचे कोविड 19 लसीकरण
Next articleदेऊळगाव राजे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बाबू पासलकर यांची बिनविरोध निवड