सावरदरीत 18 वर्षावरील नागरिकांचे कोविड 19 लसीकरण

महाळुंगे- सावरदरी (ता. खेड) येथे ग्रामपंचायत सावरदरी व फॉर्ब्स मार्शल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सावरदरी येथील 18 वर्षापुढील सर्व नागरिकांचे कोविड 19 लसीकरण करण्यात आले. यासाठी सरपंच भरत तरस व उपसरपंच संदिप पवार यांनी पुढाकार घेतला.

यावेळी कंपनीचे कुलकर्णी साहेब, विना मॅडम , स्वप्नील सर, डॉ . शेटे , तसेच सावरदरी गावचे पोलीस पाटील राहुल साकोरे, प्राध्यापक संतोष शिंदे, मच्छिंद्र शेटे सर व सावरदरीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

लसीकरणासाठी नागरिकांना आणण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने वाहनांची सोय करण्यात आली होती. संपूर्ण लसीकरण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन करण्यात आले होते. त्याबद्दल सर्व उपस्थितांनी ग्रामपंचायत व कंपनी प्रशासनास धन्यवाद दिले.

सावरदरी हे 18 वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण करणारी तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

Previous articleजांभोरी- बिरसा मुंडा शहीद दिन साध्या पद्धतीने साजरा
Next articleदूध दरवाढीसाठी दुधाने अंघोळ करून निषेध