निधन वार्ता – हरिभाऊ कोल्हे यांचे निधन

किरण वाजगे, नारायणणगाव- येथील कोल्हे मळा शिवारात राहणारे श्री हरिभाऊ बाबुराव कोल्हे (वय ९३ वर्ष) यांचे दि ६ जून २०२१ रोजी वार्धक्याने निधन झाले.

एक कुशल कारागीर, द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांची ख्याती होती. जनावरांचे आजार ,लहानमुलांचे आजार
विंचू व सर्प दंश यांवर ते प्रभावी उपचार करत असत.
बँक ऑफ इंडिया चे निवृत्त मुख्य व्यवस्थापक वसंतराव कोल्हे यांचे ते वडील होत. धर्मवीर पतसंस्थेचे उपाध्यक्ष शंकर धोंडीभाऊ कोल्हे हे त्यांचे पुतणे, उद्योजक जय व गौरव वसंत कोल्हे, पशुवैद्यक सार्थक लक्ष्मण कोल्हे, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण व सूत्रसंचालक हेमंत शंकर कोल्हे यांचे ते आजोबा होत.

Previous articleशिवशंभो छावा प्रतिष्ठानच्या वतीने श्री क्षेत्र निमगाव येथे शिवस्वराज दिन साजरा
Next articleकोरोना काळात अन्नदान करणाऱ्या भटकंती ट्रेकर्स ग्रुप ला ६६ हजार रुपयांची मदत