Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नारायणगाव (किरण वाजगे)
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव येथील विविध कोविड सेंटर मध्ये तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवणाचा डबा विनामूल्य पोहोचवणाऱ्या भटकंती ट्रेकर्स ग्रुप ला अजिंक्यतारा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे मित्र मंडळाच्या वतीने ६६ हजार रुपयांची रोख मदत देण्यात नुकतीच देण्यात आली. तसेच ११११ पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स व ड्रायफ्रुट्स देखील देण्यात आले. याचवेळी भटकंती ट्रेकर्स ग्रुप मधील सदस्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोरोना कवच पोलिसी वितरण करण्यात आली.
जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमात अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, जिल्हा परिषद च्या माजी सदस्या राजश्री बोरकर, युवा नेते अमित बेनके, विकास दरेकर, पुष्पा जाधव, सुरज वाजगे, संतोष वाजगे, शशिकांत वाजगे, किशोर पोखरणा, भावेश डोंगरे, रोहिदास केदारी, राहुल पापळ, रामदास अभंग, शेखर शेटे, शिवदास विधाटे, सोमनाथ सोनवणे, जुबेर आतार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भटकंती ट्रेकर्सच्या सदस्यांनी व गणेश वाजगे मित्र मंडळाने या समाजपयोगी कामात मोलाचे योगदान दिल्याबद्दल आमदार अतुल बेनके यांनी सुदीप कसाबे, महेश वालझाडे, तुषार दिवटे, संदीप शिंदे, अमित वालझाडे, टल्लू दळवी तसेच अनिल दिवटे यांचे विशेष कौतुक केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.