शिवशंभो छावा प्रतिष्ठानच्या वतीने श्री क्षेत्र निमगाव येथे शिवस्वराज दिन साजरा

राजगुरूनगर- भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आणि आपल्या सर्वांचा पहिला स्वातंत्र्य दिवस म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक दिन (दि.6) रोजी जून रोजी शिवशंभो छावा प्रतिष्ठानच्या वतीने श्री क्षेत्र निमगाव येथे साजरा करण्यात आला. भगव्या स्वराज्य ध्वजास शिवशंख,राजदंड, स्वराज्य गुढी उभारून त्यास अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या निर्णयानुसार हा शिवराज्यभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यासाठी शिव शंभो छावा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष भरत भाऊ पवळे , (सचिव) मनोहरजी गोरगल्ले, बाप्पुसाहेब थिटे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ), सुनील शेठ बोंबले – पुणे जिल्हा सह संपर्कप्रमुख , सचिनभाऊ राक्षे (खेड तालुका अध्यक्ष) , नवनाथ कुल्लाळ (शिरूर विधानसभा अध्यक्ष), बाळासाहेब शितकल (पुणे जिल्हा उपाध्यक्ष),तांबोळी साहेब ( जुन्नर तालुका अध्यक्ष) मा.बबनराव जग्गनाथ शिंदे पत्रकार व खंडोबा देवस्थान अध्यक्ष ,मोहनराव शिंदे शि.से,पुर्व विभाग अध्यक्ष, सलीमभाई पठाण शाखा प्रमुख शिवसेना , हर्षवर्धन शिंदे ग्रांपचायत सदस्य, बाळासाहेब सोनवणे ग्रांपचायत कर्मचारी , महिला वर्ग उपस्थित होते.

Previous articleगोरगरिबांना अडचणीच्या काळात मदत करतो त्याच्या पाठीमागे सदैव उभे राहू
Next articleनिधन वार्ता – हरिभाऊ कोल्हे यांचे निधन