सत्य साई सेवा संघटनेच्या वतीने आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांना धान्य व ताडपत्रीचे वाटप

अतुल पवळे ,पुणे

पश्चिम हवेलीतील वरदाडे आणि जांभली येथे आदिवासी कातकरी लोकांची वस्ती आहे.या लोकांचे हातावर पोट असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा त्यांचे कुटुंबांवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या लोकांचे घरांचे खूपच नुकसान झाले होते. काही लोकांचे घरांचे छप्परच उडून गेले होते. पावसाचे पाणी घरात आल्यामुळे लहान मुलांचेदेखील खूप हाल होत होते. हि परिस्थिती श्री सत्य साईसेवा संघटनेच्या साधकांनी पाहिली. ६ जून रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा राज्याभिषेक दिन आहे. हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या निमित्त सत्य साईसेवा पुणे जिल्हा संघटनेच्या वतीने या कुटुंबांना अमृत कलश व ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.

तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.याप्रसंगी नितीन वाघ, सुरेश माताळे, माऊली वसवे, लक्ष्मण दादा जावळकर, विनोद थोपटे, बाप्पू वसवे, नवनाथ खाटपे, अभिजित तावरे, विक्रम तावरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleशिवसैनिकांनी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जनजागृती करावी – रमेश कोंडे
Next articleदावडी गावात खेड तालुक्यातील पाहिल्या वीज अटकाव केंद्राची उभारणी