दावडी गावात खेड तालुक्यातील पाहिल्या वीज अटकाव केंद्राची उभारणी


राजगुरूनगर- दावडी हे पूर्व भागातील मोठं गाव आहे,दावडी गावातील लोकसंख्या जवळ पास दहा हजार आहे.दावडी गावातील विजेमुळे होणारी मनुष्य व वित्तहाणी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने महाराष्ट्र शासनाला ग्रामपंचायतीच्या मागणी नुसार खेड तालुक्यातील पाहिले वीज अटकाव केंद्र उभारण्यात येत आहे. या वीज अटकाव केंद्राच्या उभारणीचे भूमीपूजन दावडी गावचे सरपंच संभाजी घारे यांच्या हस्ते झाले.


यावेळी उपसरपंच राहुल कदम,उद्योजक सचिन नवले,पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील,मा उपसरपंच हिरामण खेसे,ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते,अनिल नेटके,पुष्पा होरे,संगीत मैंद,मेघना ववले,मारुती बोत्रे, तलाठी सतीश शेळके उपस्थित होते.

Previous articleसत्य साई सेवा संघटनेच्या वतीने आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांना धान्य व ताडपत्रीचे वाटप
Next articleलोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या प्रथम सभेत कामकाज चर्चा व मान्यवरांचे सत्कार तसेच पत्रकार व कोरोना बळींना श्रध्दांजली