शिवसैनिकांनी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जनजागृती करावी – रमेश कोंडे

अतुल पवळे, पुणे

विधानपरिषदच्या उपसभापती डॉ निलमताई गोर्हे यांचे आदेशावरून शिवसेना खडकवासला मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांचे उपस्थितीत नुकतीच पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. शासनाने अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. गरीब अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना दोन महिन्याचे धान्य वाटप सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी ८० ते ९० टक्के लोकच धान्य घेतात. उर्वरित लोकांना धान्य मिळाले पाहिजे. तसेच बांधकाम कामगार, ऑटो रिक्षावाल, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यांना अनुदान मिळाले आहे का याची खात्री शिवसैनिकांनी करावी. ज्या लोकांना धान्य मिळत नाही अशा लोकांना धान्य मिळण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्नशील राहावे. ज्या मुलांचे पालकांचे निधन झाले आहे मुलांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन रमेश कोंडे यांनी केले.

शाळा बंद असल्यामुळे शाळांचे बसचालक यांना बँकांचे हप्ते भरणे अवघड झाले आहे अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली. ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींनी विकास कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली. आपल्या गावात व प्रभागात कोरोना दक्षता समिती स्थापन करून गाव कोरोना मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा संघटिका संगीता पवळे यांनी केले.

या प्रसंगी उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, महेश मते, नितीन वाघ, बुवा खाटपे, अनिल बटाने, महेश पोकळे, निलेश गिरमे, अनिल भोसले, संतोष गोपाळ, दत्तानाना रायकर, अमोल दांगट, संजय पोळ, दीपक जाधव, चंद्रकांत केंगार, योगेश पवार, गोकुळ करंजावणे, दत्ता जोरकर, सागर बारणे, रमेश देसाई, गणेश कालेकर,निलेश गायकवाड, तुषार रायकर,संतोष शेलार, प्रसाद गीजरे, राजू चव्हाण, राज पायगुडे,बाळकृष्ण वांजळे, सागर निवांगुणे, दिपक जगताप,सौरभ मोकाशी, दीपक सुर्वे, अमोल कदम, अविनाश शुक्ला, सागर शिर्के,आकाश बालवडकर महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका संगीताताई पवळे, पंचायत समिती सदस्या सुवर्णताई करंजावणे, सरोज कार्वेकर, पूजा रावेतकर, नेहा नाईक, प्रांजल झगडे व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Previous articleजागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणिकंद पोलिस स्टेशन आवारात वृक्षारोपण
Next articleसत्य साई सेवा संघटनेच्या वतीने आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांना धान्य व ताडपत्रीचे वाटप