दुसर्‍याची भुक जाणतो तोच खरा सेवक – स.पो.नि दादासाहेब पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भवरापुर, टिळेकरवाडी येथील यशवंत फार्म जवळ आदिवासी भिल्ल वस्तीवर प्रनय धनंजय टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व गरीब कुटुंबातील लोकांना किट वाटप करण्यात आले.

या वेळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार बोलत होते.जो दिन दुबळ्याची दुःखी पिढीतांची भुक भागवतो. एक दुसर्‍याच्या दुःखामध्ये धावून जातो तोच खरा या देशाचा सेवक. आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील प्रत्येक सदस्यप्रमाणे एक झाड आपल्या दारात लाऊन त्यांचे संगोपन करणे हि काळाची गरज आहे. कारण आज कोरोणामुळे देशाची स्थिती भयानक आहे. अशा वातावरणात नागरीकांनी पोलीसांना सहकार्य करावेव आपल्या शेजारील गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाची ओढ लागावी यासाठी गरीब विद्यार्थींना सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी केले .

या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांनी केले. या वेळी उरुळी कांचन पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार, आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले ,धनंजय भिमराव टिळेकर, भवरापुर पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर, प्राध्यापक तुकाराम टिळेकर, उरुळी कांचन ग्रामपंचायत सदस्य सुनिल तांबे, सचिन टिळेकर, बाळासाहेब घाडगे, स्वप्नील भोसले व आदिवासी बांधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Previous articleदौंड महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा
Next articleपुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवराज्याभिषेक दिन साजरा