Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
चाकण : अवैध शस्त्रसाठा जवळ बाळगणाऱ्या तीन जणांच्या टोळक्यापैकी दोन सराईतांना चाकण पोलिसांनी सोमवारी ( दि.१७ मे ) बेड्या ठोकल्या आहेत. तर एक अट्टल गुन्हेगार फरार झाला असून, अटक करण्यात आलेल्यांकडून तीन गावठी बनावटीच्या पिस्तुलासह सात जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे.
प्रमोद उर्फ अंकित किशनराव भसके ( वय- २५ वर्षे, रा. चाकण.) व दत्तात्रय सूर्याजी कडूसकर ( वय – ३४ वर्षे, रा. पेठ पारगाव, ता. आंबेगाव,) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील ( रा. नाणेकरवाडी, चाकण.) हा फरार झाला आहे.
सराईत गुन्हेगार अक्षय गोविंद पाटील व त्याचा मित्र प्रमोद किसनराव भसके यांनी विक्रीसाठी गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे आणलेले असून, त्यांच्या पैकी प्रमोद भसके हा नाणेकरवाडी येथील आळंदी फाटा येथे गावठी बनावटीचे पिस्तुल विक्रीच्या उद्देशाने येणार आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी सदर माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक विजय जगदाळे व गुन्हे पथकाला सूचना दिल्या होत्या. आळंदी फाटा येथे सापळा लावला असता येथील गणेश चायनीज सेंटर जवळील टपरीसमोर प्रमोद उर्फ अंकित किशनराव भसके याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये ठेवलेले एक असे दोन गावठी बनावटीचे पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे मिळून आले. प्रमोद भसके यांच्याकडे सदर पिस्तुल व काडतूसबाबत अधिक चौकशी करता त्याने सांगितले की, मित्र अक्षय गोविंद पाटील यांच्यासह एकूण ४ पिस्तुल व काडतुसे विक्रीच्या उद्देशाने आणली होती. त्यापैकी एक पिस्तुल व काडतुसे असे अक्षय पाटील यांच्याकडे आहे. तसेच मी दोन पिस्तुल विक्रीसाठी येथे घेवून आलो होतो व आम्ही १ पिस्तुल व ३ राउंड असे दत्तात्रय सूर्याजी कडुसकर याला विक्री केलेले आहे. अशी माहिती सांगितल्या वरून चाकण पोलिसांनी दत्तात्रय याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्या ताब्यात एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे मिळाले. वरील सराईतांकडून एकूण ३ गावठी बनावटीचे पिस्तुल व ७ जिवंत काडतुसे असा अवैध शस्त्र साठा जप्त करण्यात आला.
सदर गुन्ह्यातील अक्षय गोविंद पाटील हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याचा शोध चालू आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.