प्रकाश जगताप यांची सरपंच परिषदेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक व उरुळी कांचनचे रहिवासी प्रकाश जयवंत जगताप यांची सरपंच परिषद मुंबई – महाराष्ट्रच्या पुणे जिल्हा समन्वयक पदी नेमणूक करण्यात आली आहे. सरपंच परिषद मुंबई – महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष दत्ता काकडे व प्रदेश सरचिटणीस विकास जाधव यांच्या सहीचे नियुक्ती पत्र प्रकाश जगताप यांना नुकतेच देण्यात आले व जिल्हा कार्यकारिणी गठित करुन त्याद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावात सरपंच परिषदे मार्फत मुलभूत विकासाचे दिशा दर्शक बनावे असे सुचवले आहे.

 

 

 निवडी नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रकाश जगताप म्हणाले की ग्रामीण भागातील गावांचा सर्वांगीण विकास कार्यक्रम राबविण्यात स्थानिक ग्रामपंचायतींना मदत व मार्गदर्शन करुन संतुलित विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाईल.

Previous articleबोरिबेल परिसरातील खरबूज जाग्यावरच जळून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान
Next articleगावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या दोघांना चाकण पोलीसांनी बेड्या ठोकल्या