बोरिबेल परिसरातील खरबूज जाग्यावरच जळून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान

दिनेश पवार,दौंड- तालुक्यातील बोरिबेल येथील खरबूज पीक जाग्यावरच जळून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, बोरिबेल व परिसरात कलिंगड, खरबूज,टोमॅटो, पपई, काकडी यासारख्या पिकांचे उत्पादन दरवर्षी मोठ्याप्रमाणात घेतले जाते,प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कमी क्षेत्रात जास्त उत्पादन येथील शेतकरी दरवर्षी घेतो यामुळे येथील शेतकरी व गावाला वेगवेगळ्या पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे.

 

यावर्षी परिसरातील जवळपास 100 हुन अधिक शेतकऱ्यांनी 50 हेक्टर च्या आसपास खरबूज पिकाची लागवड केली,पीक ही जोमात आले त्याला फळ ही लागले परंतु फळ परिपक्व होण्याअगोदरच वेल जाग्यावरच जळून जायला लागले हीच परिस्थिती परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात घडून आली, बघता-बघता सर्व पीक जाग्यावरच नष्ट झाले,आलेले फळ सुद्धा सुकून जळून गेल्याने सर्व शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.


याबाबत ग्रामपंचायत, शेतकरी यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी व संबंधित कंपनी वरती कारवाई करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे,यासंदर्भात कृषी विभागातील अधिकारी, संबंधित कंपनी चे अधिकारी यांनी परिसरातील सर्व क्षेत्राची पाहणी करून काही नमुने तपासणी साठी पाठवले आहे.

 

 

यावर अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे शेतकऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले,एकीकडे कोरोना, लॉकडाऊन परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती कमकुवत झाली आहे त्यात हे नवे संकट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी बोरिबेल ग्रामपंचायत सरपंच नंदकिशोर पाचपुते,शेतकरी मधुकर पाचपुते, रमाकांत पाचपुते, हरिदास पाचपुते, वसंत पाचपुते, राजू भोसले,बापू महाडिक,नितीन पाचपुते, गणेश खळदकर, तुकाराम पोटे,ईश्वर पोटे,राजू घोलप व इतर शेतकऱ्यांनी केली आहे

Previous articleजुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अटक
Next articleप्रकाश जगताप यांची सरपंच परिषदेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी निवड